ज्ञानात भर पाडणारी ‘सकाळ ज्युनियर लीडर स्पर्धा’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

नागपूर - विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे, या दृष्टिकोनातून २७ जूनपासून ‘सकाळ ज्युनियर लीडर’ ही स्पर्धा घेण्यात येत आहे. ज्युनियर लीडर स्पर्धा अनोखा अनुभव देणारी आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.  स्पर्धेत एकूण शंभर कूपन प्रकाशित केले जातील. त्यापैकी ८० कूपन विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशिकेवर लावायचे आहेत. स्पर्धेत पाचशे विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्यांसाठी स्किल डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्त्व विकासावर कार्यशाळा घेण्यात येईल. विजेत्यांना माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे ‘बियॉण्ड २०२०’ हे पुस्तक भेट देण्यात येईल.

नागपूर - विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित व्हावे, या दृष्टिकोनातून २७ जूनपासून ‘सकाळ ज्युनियर लीडर’ ही स्पर्धा घेण्यात येत आहे. ज्युनियर लीडर स्पर्धा अनोखा अनुभव देणारी आहे, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.  स्पर्धेत एकूण शंभर कूपन प्रकाशित केले जातील. त्यापैकी ८० कूपन विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रवेशिकेवर लावायचे आहेत. स्पर्धेत पाचशे विजेत्यांची निवड करण्यात येईल. विजेत्यांसाठी स्किल डेव्हलपमेंट, व्यक्तिमत्त्व विकासावर कार्यशाळा घेण्यात येईल. विजेत्यांना माजी राष्ट्रपती ए. पी. जे अब्दुल कलाम यांचे ‘बियॉण्ड २०२०’ हे पुस्तक भेट देण्यात येईल. त्यासोबतच एका प्रसिद्ध व्यक्तीसोबत संवाद आणि स्नेहभोजनाची संधी मिळेल. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. 

‘सकाळ ज्युनियर लीडर’ स्पर्धा अतिशय कौतुकास्पद उपक्रम आहे. अभ्यासाअभावी विद्यार्थी उत्तरे देऊ शकत नाहीत. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणांचा विकास होतो. नियमित स्पर्धा होत राहिल्यास विद्यार्थ्यांना व्यासपीठावर बोलण्याचे धाडस वाढते. तसेच वाचनाची आवड निर्माण होते. 
- विवेक जोशी, मुख्याध्यापक, सोमलवार हायस्कूल निकालस 

‘सकाळ ज्युनियर लीडर’ स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना फुटबॉल, क्रिकेट, हॉकी, खो-खो, कबड्डी आदी खेळण्यात रुची निर्माण होते. मैदानी खेळाची माहिती समजल्यामुळे विद्यार्थी खेळांना महत्त्व देतो. त्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक वाढ चांगल्याप्रकारे होते. 
- शशिकांत चांदे, क्रीडा शिक्षक, सोमलवार हायस्कूल निकालस 

‘सकाळ ज्युनियर लीडर उपक्रमाअंतर्गत ही स्पर्धा घेण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा उपयुक्त आहे. त्यामुळे स्पर्धेत टीकण्याचे आणि उज्ज्वल भविष्य मिळविण्याचे सामर्थ्ये निर्माण होते. या स्पर्धेचा अनुभव पूर्णपणे वेगळा आहे. 

- देवयानी देशमुख, सोमलवार हायस्कूल निकालस

‘सकाळ ज्युनियर लीडर’ हा उपक्रम मला फार आवडला. त्यामुळे मुलांची सामान्य ज्ञानाची उजळणी होते. वाचनाची आवड निर्माण होते. शालेय विद्यार्थ्यांसाठी सकाळतर्फे खूप चांगले उपक्रम नेहमीच राबविले जातात. 

- वसुधा रानाडे, सोमलवार हायस्कूल निकालस 

सकाळ ज्युनियर लीडर या सदरातील योगा व जगातील यशस्वी लोकांची माहिती मिळते. यामुळे आमचे व्यक्तिमत्त्व सुधारण्यास मदत होईल. या स्पर्धेत मी सहभाग घेतला असून, इतरांनीही सहभाग घ्यावा. 

- आदित्य भारद्वाज, सोमलवार हायस्कूल निकालस 

स्पर्धेच्या युगात वावरताना नेतृत्वगुण व व्यक्तिमत्त्वाचा विकास होणे गरजेचे आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत इतर माहिती मिळणे अतिशय महत्त्वाची बाब असते. त्यासाठी ज्युनियर लीडर स्पर्धा सर्वोत्तम पर्याय आहे.

- क्रिष्णा वरफडे, सोमलवार हायस्कूल निकालस 

Web Title: nagpur vidarbha news sakal junior leader competition