जप्त वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 सप्टेंबर 2017

नागपूर - कुश कटारिया हत्याकांडात तिहेरी जन्मठेपेचा आरोपी आयुष पुगलियाचा जेलमध्ये खून झाल्यानंतर धंतोली पोलिसांनी रक्‍ताने माखलेली फरशी, दोघांचेही कपडे, रक्‍ताने माखलेली कटनी आणि अन्य काही वस्तू जप्त केल्या होत्या. त्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये बुधवारी सोपविण्यात आल्या. तसेच आरोपी सूरज कोटनाके याचा गुन्हेगारी रेकॉर्ड चंद्रपूर आणि कारागृहातून मागविण्यात आला असून, त्यावरही धंतोली पोलिस तपास करीत आहेत.

नागपूर - कुश कटारिया हत्याकांडात तिहेरी जन्मठेपेचा आरोपी आयुष पुगलियाचा जेलमध्ये खून झाल्यानंतर धंतोली पोलिसांनी रक्‍ताने माखलेली फरशी, दोघांचेही कपडे, रक्‍ताने माखलेली कटनी आणि अन्य काही वस्तू जप्त केल्या होत्या. त्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये बुधवारी सोपविण्यात आल्या. तसेच आरोपी सूरज कोटनाके याचा गुन्हेगारी रेकॉर्ड चंद्रपूर आणि कारागृहातून मागविण्यात आला असून, त्यावरही धंतोली पोलिस तपास करीत आहेत.

सूरज कोटनाके हा कुख्यात गुन्हेगार असून, त्याने चंद्रपूरला सख्ख्या मामाचा गळा चिरून खून केला होता. मामाचा मृतदेह रेतीमध्ये पुरून ठेवला होता. आठ दिवसांनंतर हत्याकांड उघडकीस आले. साक्षी-पुराव्याअंती सूरजला जन्मठेपेची शिक्षा झाली. त्याने सोमवारी सकाळी आयुष पुगलियाच्या डोक्‍यावर फरशीने हल्ला केला. त्यानंतर कटनीने त्याचा गळा चिरून खून केला. धंतोली पोलिस बुधवारी सायंकाळपर्यंत आरोपी सूरज कोटनाकेला ताब्यात घेणारी होते. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली आहे, तर गृहमंत्रालयाकडून आदेशपत्र येणे बाकी आहे. मात्र, काही तांत्रिक अडचणीमुळे त्याला गुरुवारी दुपारपर्यंत अटक करण्यात येणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणी धंतोलीत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये कलमांची वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे प्रभारी निरीक्षक शेंडे यांनी सांगितले. आरोपी सूरज कोटनाकेच्या बॅंक अकाउंट आणि भेटीगाठी घेणाऱ्यांची चौकशी पोलिस करणार आहे, तर दुसरीकडे आयुषचा भाऊ नवीन पुगलिया यांनी भावाची ‘सुपारी किलिंग’ असल्याचा आरोप केला आहे. 

नवीन पुगलिया पोहोचला ठाण्यात 
भावाच्या खून प्रकरणात धंतोली पोलिसांनी आतापर्यंत काय कारवाई केली,  याबाबत माहिती घेण्यासाठी आयुषचा भाऊ नवीन पुगलिया आज दुपारी धंतोली पोलिस ठाण्यात पोहोचला होता. त्याने निरीक्षक शेंडे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी निष्पक्षपणे चौकशी आणि तपास सुरू असल्याची माहिती दिली.

थंड डोक्‍याने केला खून
आयुष पुगलिया आणि सूरज कोटनाके या दोघांनाही बरॅक क्र. पाचमध्ये ठेवण्यात आले होते. त्या दोघात तीन दिवसांपूर्वी वाद आणि मारामारी झाल्याचा बनाव कारागृह प्रशासनाने केला. मात्र, धंतोली पोलिसांच्या चौकशीत असे काहीही आढळून आले नाही. बरॅकमध्ये असलेल्या कैद्यांनी आयुष आणि सूरज यांच्यात कधीही वाद झाला नव्हता, असे बयाण दिल्याची माहिती आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनाच्या भूमिकेवर संशय निर्माण झाला आहे. सूरजने थंड डोक्‍याने आयुषचा खून केला. त्याला मारण्यासाठी सूरजला पुरेसा वेळा मिळाला. त्यावेळी जेलरक्षकही उपस्थित नव्हता, हे विशेष.

Web Title: nagpur vidarbha news seized goods in forensic lab