...अजून ‘ग्रीप’ पकडलीच नाही - शेखर शेंडे

...अजून ‘ग्रीप’ पकडलीच नाही - शेखर शेंडे

नागपूर - घराचे काम पूर्ण झाले की, आम्हाला संधी मिळते. टाइल्स लावण्याच्या कामात मेहनतीसोबत बुद्धीचीही किंमत असल्याने चांगल्या कमाईसोबत हाताला बारमाही काम राहायचे. परंतु, नोटाबंदी जाहीर झाली आणि व्यवसायात मंदी आली. सुरुवातीच्या दिवसांत पोट भरणे कठीण झाले होते. आता चार-सहा महिन्यांपासून कामात थोडी गती आली. परंतु, जीएसटीमुळे घराची कामे ठप्प झाली. मागच्या वर्षीपासून डबघाईस आलेल्या व्यवसायाने अद्याप ग्रीप पकडलीच नसल्याने पोटापाण्याचा प्रश्‍नच आहे, ही कैफियत आहे ४२ वर्षीय शेखर शेंडे यांची. 

शेंडे २० वर्षांपासून टाइल्स लावण्याचे काम करतात. वडील, भाऊ याच व्यवसायात असल्याने अंगी उपजत असलेल्या कौशल्याचे त्यांनी सोने केले. बऱ्यापैकी मिळकत असल्याने शेंडे कुटुंबीयांचे चांगले चालले होते. परंतु, नोटाबंदीनंतर कामे ठप्प झाली. नवी कामे सुरू करण्यास बिल्डर अनुत्सुक आहेत, प्लॉटविक्री ठप्प असल्याने शेंडे यांच्यासारख्या अनेकांच्या हाताला  काम नाही. त्यांना मदतनीस म्हणून काम करणाऱ्यांची तीच स्थिती आहे.

पहिलेसारखे काम नाही - चेतन सलोटे  
पाच वर्षांपासून शेंडे यांच्यासोबत काम करणारा चेतन सेलोटे म्हणाला, नोटाबंदीनंतर पैशाचा तुटवडा हा आमचा प्रश्‍नच नव्हता. आमच्या हातचा रोजगारच हिरावला गेला. आर्थिक अडचणीमुळे चार-सहा महिने गावाकडे घालवल्यानंतर पुन्हा कामावर आलो. परंतु, आताही पहिलेसारखे काम मिळत नसल्याने दुसरे काम करण्याचा विचार मनात येतो.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com