गर्भपातावरून समाजमन सुन्न

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

सोशल मीडियावर चिंता व्यक्त - उद्यानांना केले लक्ष्य

नागपूर - वर्षभरात १५ ते १९ वयोगटातील १७२ अविवाहितांनी केलेल्या गर्भपाताने समाजमन सुन्न झाले आहे. गर्भपाताच्या आकडेवारीने अनेकांनी शहरातील उद्यानांतील चाळ्यांना लक्ष्य करतानाच पालकही पाल्यांबाबत गंभीर नसल्याची खंत सोशल मीडियावर व्यक्‍त केली.

सोशल मीडियावर चिंता व्यक्त - उद्यानांना केले लक्ष्य

नागपूर - वर्षभरात १५ ते १९ वयोगटातील १७२ अविवाहितांनी केलेल्या गर्भपाताने समाजमन सुन्न झाले आहे. गर्भपाताच्या आकडेवारीने अनेकांनी शहरातील उद्यानांतील चाळ्यांना लक्ष्य करतानाच पालकही पाल्यांबाबत गंभीर नसल्याची खंत सोशल मीडियावर व्यक्‍त केली.

दै. ‘सकाळ’ने रविवारी ‘१७२ अविवाहितांचा गर्भपात’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले. २०१६-१७ या वर्षात विविध वयोगटांतील १३ हजार ८१३ महिलांनी गर्भपात केल्याचे एमटीपीच्या आकडेवारीत स्पष्ट आहे. यात १५ ते १९ वयोगटातील गर्भपात करणाऱ्या तरुणींची संख्या १७४ आहे. शहरातील अधिकृत गर्भपात केंद्रांत झालेल्या गर्भपाताची ही आकडेवारी आहे. अनधिकृत गर्भपात केंद्रात होणाऱ्या किंवा घरगुती उपायातूनही गर्भपात केले जाते. त्यामुळे ही आकडेवारी यापेक्षाही मोठी असण्याची शक्‍यता या वृत्तातून व्यक्त केली.

सोशल मीडियावर या बातमीची ‘नेटिझन्स’नी दखल घेत प्रतिक्रिया व्यक्त केल्या. राज मेहर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शहरातील उद्यानांमध्ये तरुण-तरुणींच्या चाळ्यांना लक्ष्य केले. सारे काही उघड्या डोळ्यांनी बघितले जात असल्याच्या वृत्तीवरही त्यांनी टोला हाणला. याशिवाय एकाने हे भीषण वास्तव्य असले, तरी याकडे कुणी लक्ष देत नसल्याची खंत व्यक्त केली. अनेकांनी ही आकडेवारी धक्कादायक असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

‘सकाळ’ने मांडले धक्कादायक वास्तव
‘सकाळ’ वर्तमानपत्रातील गर्भपाताबाबतची बातमी वाचून धक्का बसला. आजकालची मुले-मुली तोंडाला रुमाल बांधून फिरतात. समाजाचे हे चित्र अपेक्षित नव्हते. १५-१९ वयोगटातील गर्भपाताचे वास्तव धक्कादायक आहे, अशी खंत शिवाजी विज्ञान महाविद्यालयील प्राचार्य डॉ. देवेंद्र बुरघाटे यांनी व्यक्त केली. ते शिवाजी महाविद्यालयात झालेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.

Web Title: nagpur vidarbha news society numb from abortion