स्टॉर्म ड्रेन लाइनची सफाई नाहीच

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

अधिकाऱ्यांनी केली धूळफेक - अनेक पावसाळी नाल्या तुंबल्या  

नागपूर - शहरातील नाले, रस्त्यांच्या बाजूला असलेल्या पावसाळी नाल्या (स्टॉर्म ड्रेन लाइन) स्वच्छतेसाठी महापौर, आयुक्तांनी अधिकाऱ्यांना वारंवार निर्देश दिले. मात्र, अधिकाऱ्यांनी केवळ महापौर, आयुक्तांच्या डोळ्यात धूळफेक केल्याचे आज झालेल्या पावसातून दिसून आले. शहरातील अनेक पावसाळी नाल्यांमध्ये पाणी तुंबले अन्‌ ते रस्त्यांवरून वाहत असल्याने झोन सहायक आयुक्तांचे पितळ उघडे पडले आहे.

शहरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी जमा होऊन वाहतुकीची कोंडी होऊ नये, यासाठी रस्त्याच्या बाजूच्या ड्रेन लाइनच्या स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले जाते. यावर्षी शहरातील नाले, ड्रेन लाइन स्वच्छतेबाबत एप्रिलपासून महापौर नंदा जिचकार, आयुक्तांनी सातत्याने बैठक घेऊन झोनच्या सहायक आयुक्तांना निर्देश दिले. महापौर नंदा जिचकार, आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांनी याबाबत अधिकाऱ्यांकडून सातत्याने माहिती घेतली.

अधिकाऱ्यांनी प्रत्येक बैठकीत नाले स्वच्छ केल्याची खात्री दिली. मात्र, आज झालेल्या पावसाने झोन सहायक आयुक्तांचे पितळच उघडे पडले. शहरातील अनेक ड्रेन लाइन स्वच्छ झाली नसल्याचे दिसून आले. धरमपेठ झोनमध्ये माटे चौक ते प्रतापनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील ड्रेन लाइनमध्ये पावसाचे  पाणी तुंबल्याचे ठिकठिकाणी दिसून आले. त्याचप्रमाणे तुकडोजी पुतळा चौक ते मानेवाडा सिमेंट रोडच्या बाजूच्या ड्रेन लाइनचीही अशीच स्थिती असल्याचे दिसून आले. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नाले सफाईच्या महापालिकेच्या दाव्याला सुरुंग लागला आहे.

रस्ते जलमय होण्याची शक्‍यता 
आज रिमझिम पावसाने ड्रेन लाइन तुंबल्या व रस्त्यांवरून पाणी वाहताना दिसून आले. जोरदार पाऊस आल्यास शहरातील रस्तेच जलमय होण्याची शक्‍यता यामुळे निर्माण झाली आहे. ड्रेन लाइन स्वच्छ न केल्याचे इतरही परिणाम होण्याची शक्‍यता आहे. 

लाखोंचा खर्च कुठे जातोय? 
शहरात ९०० किलोमीटरची स्टॉर्म लाइन आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ड्रेनेज लाइनच्या सफाईवर दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. परंतु, पाऊस आला की त्या तुंबतात. त्यामुळे लाखोंचा खर्च जातोय कुठे? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

Web Title: nagpur vidarbha news storm drain line no cleaning

टॅग्स