वर्गात हुक्‍का पिताना आढळले विद्यार्थी!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

नागपूर - वर्धा मार्गावरील एका नामांकित शाळेतील नवव्या वर्गाच्या तीन विद्यार्थ्यांनी वर्गातच हुक्‍का पिणे सुरू केले होते. मधल्या सुटीत या तीनही विद्यार्थ्यांना हुक्‍का पिताना वर्गशिक्षकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी संबंधित विद्यार्थ्यांना तीन दिवसांसाठी निलंबित केल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. 

नवी दिल्लीतील प्रद्युम्न हत्याकांडानंतर पालक आणि शाळा प्रशासनही सतर्क झाले असून वर्गांची आकस्मिक तपासणी आणि बस चालक-वाहकांच्या बैठका घेणे सुरू केले आहे. अशी सर्व तयारी सुरू असताना शहरातील नावाजलेल्या शाळेत हा प्रकार उघडकीस आला. विद्यार्थ्यांनी दप्तरात हुक्‍का पॉट आणि सुगंधी तंबाखू आणला. शुक्रवारी मधल्या सुटीत वर्गखोलीत कुणीही नसताना तिघेही हुक्‍का पीत होते. वर्गशिक्षक अचानक आल्याने त्यांचे बिंग फुटले. शिक्षकांना बघून विद्यार्थ्यांनी खिडकीच्या पडद्याआड हुक्‍का पॉट लपविला. मात्र, शिक्षकाच्या लक्षात प्रकार आला. त्यांनी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांकडे नेले. मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांच्या पालकांना ताबडतोब शाळेत बोलावून घडलेला प्रकार सांगितला. या घटनेमुळे शैक्षणिक जगतात एकच खळबळ उडाली असून पालकवर्ग चिंतेत आहे.

ऑनलाइन बोलावला हुक्का
या विद्यार्थ्यांना हुक्‍क्‍याचे आकर्षण होते. त्यांनी ऑनलाइन खरेदीसाठीच्या वेबसाइटवरून हुक्‍का पॉट खरेदी केला. सोबतच फ्लेवर-तंबाखू विकत घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते दप्तरात हुक्‍का आणत होते. या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी तीन दिवसांसाठी निलंबित केल्याची माहिती आहे.

Web Title: nagpur vidarbha news student found hukka smoke in school