महाधिवक्‍ता असताना राज्य भिकारचोट नव्हते का?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

नागपूर - महाराष्ट्राला भिकारचोट म्हणणे भाजपच्या नेत्यांना चांगलेच जिव्हारी लागले आहे. राज्याचे महाधिवक्तापद स्वीकारताना ॲड. श्रीहरी अणे यांना महाराष्ट्रात संपन्न वाटले होते काय? असा सवाल भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे यांनी केला. अणे यांच्या राजीनाम्याचे कारण सर्वांनाच ठाऊक आहे, असे सांगून कोहळे यांनी याविषयावर अधिक बोलण्याचे टाळले. 

विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी राबविण्यात आलेल्या रक्त स्वाक्षरी अभियानाचा रविवारी समारोप झाला. या वेळी बोलताना वीराचे संस्थापक अध्यक्ष श्रीहरी अणे यांनी अच्छे दिनसाठी पैसे लागतात. महाराष्ट्र भिकारचोट असल्याने ते विदर्भाला पोसतील याची अपेक्षा करणे चुकीचे असल्याचे विधान केले होते. भाजपच्या काळात अच्छे दिन येणार नाही, लोकांना कळले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपच्या तसेच विदर्भविरोधी नेत्यांचा पराभव करावा, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. यामुळे भाजपच्या वतुर्ळात चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. या वक्तव्याचा अद्याप भाजपच्या कुठल्याही नेत्यांनी निषेध नोंदवला नाही. 

नितीन गडकरी षष्ट्यब्दीपूर्ती सोहळ्यात गोळा झालेल्या गौरव निधीची रक्कम वाटपाचा कार्यक्रम जाहीर करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी पत्रकार परिषद झाली. यावेळी ॲड. अणे यांच्या वक्तव्यावर आपले काय मत आहे, असा प्रश्‍न उपस्थित केला असता, महाधिवक्तपद सोडण्याची कारणे सर्वांनाच ठाऊक असल्याचे सांगितले. मात्र, ती नेमकी कोणती याचा गौप्यस्फोट करण्याचे कोहळे यांनी टाळले.

Web Title: nagpur vidarbha news sudhakar kohale talking