ताई स्वप्नात म्हणाली, माझ्याकडे ये..!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 एप्रिल 2018

नागपूर - मृत्यू पावलेल्या थोरल्या बहिणीने स्वप्नात येऊन स्वर्गात सोबत चलण्याचा हट्‌ट केला. त्यामुळे थोरल्‍या बहिणीच्या प्रेमापोटी स्वतःच्या अंगावर रॉकेल घेऊन पेटवून घेत धाकटीने जीवनयात्रा संपविली. ही घटना काल्पनिक नसून सत्य आहे. आकांक्षा अजयकुमार गुप्ता (वय १६, भिवसनखोरी, दाभा) असे आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव असून या प्रकरणी नागपुरातील गिट्टीखदान पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयकुमार गुप्ता पत्नी एक मुलगा व तीन मुलीसह भिवसनखोरीत राहतात. मोलमजुरी करून कुटुंबाचा गाडा ओढतात. दोन मुलींची लग्न झाली  आहेत. एक जरीपटक्‍यात तर दुसरी दिल्लीला होती. आकांक्षा हिने आठव्या वर्गापासून शिक्षण सोडले तर मुलगा आठव्या वर्गात शिकतो. सर्वांत मोठी बहीण ज्योती हिचे आकांक्षावर जिवापाड प्रेम होते. 

दोघीही कामावर सोबतच जायच्या तर एकमेकींशिवाय जेवणसुद्धा करीत नव्हत्या. विवाह झाल्यानंतर वर्षभरापूर्वी दिल्लीत ज्योतीचा मृत्यू झाला. बहिणीच्या मृत्यूनंतर आकांक्षा नैराश्‍यात गेली होती. बहिणीच्या मृत्यूचे तिला अतीव दुःख झाले. मृत्यूनंतर मोठी बहीण आकांक्षाच्या स्वप्नात येत होती. ‘लाल साडी दाखवून स्वर्गात सोबत चलण्याचा हट्‌ट करीत होती’. बहिणीच्या हट्‌टापायी आकांक्षाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. २७ मार्चला रात्री साडेदहा वाजता  भाऊ आणि आई घराच्या बाहेर बसले होते. घरात कुणी नसल्यांची संधी साधून आकांक्षाने अंगावर रॉकेल घेतले आणि पेटवून घेतले. 

हा प्रकार लक्षात आला. आरडाओरड करून तिला मेयोत दाखल करण्यात आले. ती ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त जळाली होती. तिच्या मृत्यूपूर्व बयाणात तिने बहिणीचा हट्‌ट आणि स्वर्गात नेण्याबाबत खुलासा केला. डॉक्‍टरांनी तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र ते अपुरे पडले.

अंधश्रद्धेचा बळी!
अंधश्रद्धेपोटी आकांक्षाने आत्महत्या केली. बहिणीचा मृत्यू झाला. त्याचे तिला दुःख होतेच.  परंतु, मृत्यू झालेली बहीण स्वप्नात येते आणि स्वर्गात चलण्यास सांगते. बहिणीजवळ स्वर्गात जाण्यासाठी ती आत्महत्या करते. हा सर्व प्रकार अंधश्रद्धेतून घडल्याची चर्चा आहे.

Web Title: nagpur vidarbha news suicide