उष्माघाताच्या रुग्णांची संख्या रोडावली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

नागपूर - एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून उन्हाचे चटके जाणवत आहेत. आगामी काळात हे चकटे अधिक तीव्र होतील. त्रासदायक उन्हाळा अनारोग्यास कारणीभूत ठरतो. पारा दिवसेंदिवस वाढत असताना पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत उष्माघाताच्या रुग्णसंख्येत घट झाल्याचे दिसून येते. गेल्या तीन वर्षांपासून मेडिकलमधील शीत वॉर्डात उष्माघाताचा एकही रुग्ण भरती नसल्याची माहिती पुढे आली. 

उन्हाळ्यात अल्पश्रमानेही थकवा जाणवतो. या काळात शरीरातून घामावाटे जीवनावश्‍यक सोडियम, पोटॅशियम, पाणी बाहेर टाकलं जातं आणि जीवनघटकांचा नाश होतो. यामुळे क्षयरोग, गोवर, कांजण्या, नागिणसारखे विकार होण्याचा धोका असतो. विशेषत: शरीरातील पाणी कमी झाल्याने उष्माघाताचाही धोका संभवतो. तसेच सर्वांगाचा दाह होणे, अतिसार, लघवीला जळजळ होणं, उलटी तसेच डोकेदुखीसारखे त्रास होतात. मात्र, अलीकडे सामान्य जनताही आरोग्याप्रति सजग झाली आहे. 

ऋतूनुसार जीवनशैली तसेच कार्यशैलीत बदल होत असल्यानेच कडक उकाडा असतानाही उष्माघाताचे रुग्ण दिसत नाही. 

सामाजिक संस्थांचाही पुढाकार
पूर्वीच्या तुलनेत मागील काही वर्षांत सामजिक आणि धार्मिक संस्थांच्या पुढाकाराने शहरात विविध ठिकाणी ‘प्याऊ’ लावण्यात आले. पादचाऱ्यांसह रिक्षाचालक तसेच साऱ्यांनाच गार पाणी उपलब्ध होते. शहरातील हा बदलही रुग्णसंख्या कमी होण्यास कारणीभूत आहे. पूर्वीच्या सायकलरिक्षांची जागा आता ई-रिक्षांनी घेतली आहे. सवारीच्या शोधात रिक्षाचालक उकाड्यातही सेवा देत असत. 

अलीकडे रस्त्याच्या कडेला रिक्षा थांबवून वृक्षाच्या सावलीत आराम करताना दिसतात. नवीन इमारतीच्या बांधकामावरील कामगारांनाही भरउन्हात दुपारच्या वेळी काम बंद ठेवण्यास सांगितले जाते.

‘हिट ॲक्‍शन प्लान’ची अंमलबजावणी 
पारा प्रचंड वाढला असला तरी एका विशिष्ट मर्यादेनंतर ‘हिट ॲक्‍शन प्लॉन’ कार्यान्वित करण्यासंदर्भात प्रशासनाकडून निर्देश दिले जातात. शहरात सुरू असलेल्या सर्व विकासकामांकरिता ॲक्‍शन प्लानची अंमलबजावणी अनिवार्य केली आहे. महामेट्रोचे कामही ‘हिट ॲक्‍शन प्लान’मुळे दुपारच्या वेळी चार तास बंद ठेवण्यात आले होते, हे विशेष.

Web Title: nagpur vidarbha news sunstroke patient increase