यंदा चहापत्तीचे दर वाढण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

आसाममधील पुराचा फटका - जीएसटीचा लाभ मिळणे अशक्‍य
नागपूर - वस्तू व सेवा करात चहावरील कर कमी झाल्याने दर कमी होतील, अशी शक्‍यता असताना दार्जिलिंगमधील आंदोलन आणि आसामातील अतिवृष्टीमुळे चहा उत्पादनाला यंदा फटका बसणार आहे. त्यामुळे चहाचे नवीन उत्पादन बाजारात येताच दरात प्रतिकिलो २५ ते ४० रुपयांची वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. 

केंद्र सरकारने चहावर पाच टक्के जीएसटी आकारला. राज्यात यापूर्वी चहावर आठ टक्‍के कर होता. तीन टक्के कर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळेल, असे बोलले जात होते. परंतु, आसाममधील अतिवृष्टी आणि दार्जिलिंगमधील तीव्र आंदोलनाचा फटका चहाच्या मळ्यांमधील चहातोडणी आणि उत्पादनाला बसला, अशी माहिती विदर्भ टी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल अहीरकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.  तब्बल ३५ वर्षांनंतर गेल्या वर्षी चहा निर्यातीत २३० दशलक्ष किलोंचा टप्पा भारताने पार केला. रशिया, इराण, जर्मनी, पाकिस्तान, बांगलादेश आणि संयुक्त अमिराती या देशांनी अधिक चहा खरेदी केल्याने निर्यात वाढली होती.

त्यामुळे देशाला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन मिळाले. जगात दरवर्षी ३६ लाख ४३० हजार टन चहाचा वापर होतो. चहाच्या वापरात चीनने भारताला मागे टाकले. सद्य:स्थितीत भारतात जगात सर्वाधिक चहाप्रेमी असून, दरवर्षी चहा पिणाऱ्यांच्या संख्येत २.५१ टक्के वाढ होत आहे. सन २०१७ पर्यंत चहापत्तीचे उत्पादन ३१ लाख टनापर्यंत पोहोचण्याची शक्‍यता वर्तविली होती. मात्र, यंदा आसाममध्ये आलेल्या पावसामुळे ती शक्‍यता मावळली असल्‍याचेे अहीरकर यांनी सांगितले. 

चहाचे दर (प्रतिकिलो)  
२०१४      २८०    ३८०
२०१५      २७०    ४००
२०१६     २२०    ३५०
२०१७      २४०    ४१०

Web Title: nagpur vidarbha news tea rate increase chances