नागपुरात पारा ४१.४ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

नागपूर - विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, रविवारीही सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरातच झाली. उपराजधानीत पारा ४१.४ अंशांवर राहिला. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, एप्रिलच्या पहिल्या दिवशी विदर्भात उष्णलाटेचा अंशत: प्रभाव दिसून आला. नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाचे चटके बसले. शनिवारी ४१.६ अंशांवर गेलेल्या पाऱ्यात आज किंचित घट होऊन ४१.४ अंशांवर स्थिरावला. तर, चंद्रपुरात विदर्भातील सर्वाधिक ४२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. चित्र शीतपेयांच्या दुकानांवर पाहायला मिळाले.

नागपूर - विदर्भात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, रविवारीही सर्वाधिक तापमानाची नोंद चंद्रपुरातच झाली. उपराजधानीत पारा ४१.४ अंशांवर राहिला. प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, एप्रिलच्या पहिल्या दिवशी विदर्भात उष्णलाटेचा अंशत: प्रभाव दिसून आला. नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये उन्हाचे चटके बसले. शनिवारी ४१.६ अंशांवर गेलेल्या पाऱ्यात आज किंचित घट होऊन ४१.४ अंशांवर स्थिरावला. तर, चंद्रपुरात विदर्भातील सर्वाधिक ४२.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. चित्र शीतपेयांच्या दुकानांवर पाहायला मिळाले. विदर्भात उन्हाची लाट आणखी दोन दिवस कायम राहण्याची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

Web Title: nagpur vidarbha news temperature increase