सभागृहाबाहेरील घडामोडीला महत्त्व नाही

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

नागपूर - राजकीय पक्षाकडून देण्यात येणारा ‘व्हीप’ हा सभागृहातील कामकाजापुरता असतो. यामुळे सभागृहाबाहेर त्या ‘व्हीप’ला महत्त्व नाही. यामुळे सोळा नगरसेवकांनी गटनेतेपदी केलेली नियुक्ती योग्य असल्याचा दावा तानाजी वनवे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केला. 

संजय महाकाळकर यांची महापालिकेच्या गटनेते पदावर नियुक्ती २९ नगरसेवकांनी एकमताने केली होती. त्या नियुक्तीला प्रदेशाध्यक्षांकडूनही मान्यता देण्यात आली होती. परंतु, नंतर काँग्रेस नगरसेवकांनी महाकाळकर यांच्यावर अविश्‍वास व्यक्त करीत दुसऱ्यांदा बैठक घेतली. 

त्यात तानाजी वनवे यांना गटनेता म्हणून निवडले. तर, महापौरांनीही तानाजी वनवे यांच्या नियुक्तीला  वैध मानले आहे. महाराष्ट्र महापालिका कायद्यातील कलम १९ (१)(अ)(अ)मध्ये नमूद केलेली पार्टी म्हणजे मूळ राजकीय पक्ष होय. अशावेळी महापालिका स्तरावरील पार्टीला मूळ राजकीय पक्षाने घेतलेला निर्णय मान्य करणे बंधनकारक आहे, असा युक्तिवाद महाकाळकर यांच्यातर्फे करण्यात आला. 

याला प्रत्युत्तर देत वनवे यांनी प्रदेश काँग्रेस अथवा मूळ राजकीय पक्षाने दिलेला आदेश हा सभागृहातील कामकाजाकरिता असतो. सभागृहाबाहेरील राजकीय प्रक्रियेला सदर  आदेश बाधा पोहोचवू शकत नाही. त्यामुळे १७ नगरसेवकांनी सभागृहाबाहेर घेतलेला निर्णय हा त्यांचा अधिकार असल्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. 

दरम्यान, महाकाळकर यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अडीच वर्षांच्या कालावधीकरिता केल्याचा दावा आहे. परंतु, महापालिका कायद्यात गटनेते अथवा विरोधी पक्षनेते यांचा कार्यकाळ निश्‍चित नसल्यामुळे महाकाळकर यांची अडीच वर्षांकरिता नियुक्ती वैधानिक नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: nagpur vidarbha news There is no importance outside the auditorium