धंतोलीनंतर धरमपेठमधील ‘ब्लॉकेज’ निघणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

नागपूर - धंतोलीतील वाहतुकीची समस्या लक्षात घेता तोडगा म्हणून वाहतूक पोलिसांनी ‘नो पार्किंग झोन आणि वन वे’ची शक्कल लढविली. ते नियोजन यशस्वीरीत्या सुरू आहे. धंतोलीच्या धर्तीवर आता धरमपेठ परिसरात होत असलेली वाहतुकीची कोंडी व पार्किंगच्या गंभीर समस्येबाबत वाहतूक पोलिस आणि महापालिकेने काही उपाययोजना लागू केल्या आहेत. यात दोन मार्गांवर वाहनांना निर्बंध लावण्यात आले आहेत. समस्येवर तोडगा म्हणून वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. याबाबतची अधिसूचना १२ ऑगस्ट ते १६ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहतूक पोलिस दंडात्मक कारवाई करणार आहेत.

धरमपेठ परिसर विकसित झाल्यानंतर कालांतराने रहिवासी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आस्थापना, रुग्णालय, बॅंक, शासकीय, निमशासकीय कार्यालय, व्यावसायिक प्रतिष्ठानासह गोकूळपेठ भाजीबाजारामुळे वाहतुकीची कोंडी नेहमीच होत होती. याशिवाय मंगल कार्यालये, खासगी कार्यालये व हॉटेलही आहेत. परंतु, अनेक इमारतींमध्ये पार्किंगची सुविधा नसल्याने वाहने रस्त्यावरच ठेवण्यात येतात. यामुळे वाहतूक विस्कळीत होत होती. वाहतूक पोलिसांना धरमपेठ परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश दिले. वाहतूक पोलिसांनी धोरण निश्‍चित करून कॅफे हाउस चौक ते पूर्व पश्‍चिम मार्ग आणि टाइम्स चौक ते पूर्व पश्‍चिम मार्गावर पूर्णतः वाहनांना बंदी घातली आली आहे. याशिवाय दोन मार्गांवर चारचाकी वाहनांना निर्बंध, दुचाकी वाहनांसाठी दोन मार्गी पार्किंग झोन तर चारचाकी वाहनांसाठी पाच मार्गी पार्किंग झोन निश्‍चित केले आहे. शासकीय वाहने, पोलिस विभागाची वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि अधिकृत ऑटो थांबे यांना या अधिसूचनेतून वगळण्यात आले आहे. या अधिसूचनेला शनिवारपासून सुरुवात करण्यात आली आहे. १६ सप्टेंबरपर्यंत अधिसूचना लागू राहणार आहे. या अधिसूचनेवर काही आक्षेप, सूचना असल्यास वाहतूक शाखा क्रमांक-२, पोलिस निरीक्षक यांच्या सिव्हिल लाइन्स येथील कार्यालयात कळविण्याचे सांगण्यात आले आहे. 

चारचाकी वाहनांकरिता ‘पार्किंग झोन’
 १) टिळकनगरला जाणाऱ्या मार्गावरील जयभोले मंदिर ते कनोजिया ड्रायव्हिंग स्कूल नाल्यालगत 
मोकळा मार्ग 
२) टाइम्स चौक ते रेल हाउसपर्यंत नाल्यालगत मोकळा मार्ग 
३) ताज दरबार बॅंड पार्टी लक्ष्मीभवन चौक ते इंदूर नमकीनपर्यंत सिंगल लेन पार्किंग 
४) लक्ष्मीभवन चौक येथील भाजी मार्केटच्या आतील पूर्वेकडील मोकळा मार्ग 
५) रामनगर चौक येथील राममंदिराच्या मागील एनआयटीचे मोकळे मैदान

वाहतुकीचे नियोजन याप्रमाणे 
चारचाकी वाहनांकरिता ‘नो पार्किंग झोन’ 

१) लॉ कॉलेज चौक ते शंकरनगर चौक दोन्ही बाजूंतील मार्ग 
२) लक्ष्मीभवन चौक ते रामनगर चौक दोन्ही बाजूंतील मार्ग 

दुचाकी वाहनाकरिता ‘पार्किंग झोन’ 
१) लॉ कॉलेज चौक ते शंकरनगर चौक दोन्ही 
     बाजूंतील मार्गावर सिंगल लेन पार्किंग 
२) लक्ष्मीभवन चौक ते रामनगर चौक दोन्ही 
    बाजूंतील मार्गावर सिंगल लेन पार्किंग 

पूर्णतः वाहनांना बंदी 
१) कॅफे हाउस चौक ते पूर्व पश्‍चिम मार्ग 
२) टाइम्स चौक ते पूर्व पश्‍चिम मार्ग 

Web Title: nagpur vidarbha news traffic issue