दोन महिन्यांत बदली रद्द

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

बॅक टू मनोरुग्णालय - शासनाच्या धोरणाबाबत उलटसुलट चर्चा

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयातील दोन परिचारिकांचीही बदली झाली. परंतु, अवघ्या दोन महिन्यांत बदली झालेल्या परिचारिका पुन्हा मनोरुग्णालयातच रुजू झाल्या. अवघ्या दोन महिन्यांत दोन्ही परिचारिका बॅक टू मनोरुग्णालय कशा आल्या, या चर्चेला उधाण आले आहे.

बॅक टू मनोरुग्णालय - शासनाच्या धोरणाबाबत उलटसुलट चर्चा

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयातील दोन परिचारिकांचीही बदली झाली. परंतु, अवघ्या दोन महिन्यांत बदली झालेल्या परिचारिका पुन्हा मनोरुग्णालयातच रुजू झाल्या. अवघ्या दोन महिन्यांत दोन्ही परिचारिका बॅक टू मनोरुग्णालय कशा आल्या, या चर्चेला उधाण आले आहे.

तीन किंवा अधिक वर्षे एकाच ठिकाणी असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली हा शासनाचा नियमच आहे. त्यानुसार, डॉक्‍टर, परिचारिका तसेच अधिकाऱ्यांना सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच बदलीचा डोस दिला. राज्य शासनाकडून बदल्यांचे धोरण राबवले जात आहे. मात्र, बदलीनंतर पुन्हा त्या कर्मचाऱ्यांचे पूर्वीच्याच ठिकाणी पुनवर्सन करण्याच्या या शासनाचे धोरण निराळेच असल्याचे दिसून येते. जिल्हास्तरावर मानसोपचार उपचारांचा दर्जा वाढविण्यासाठी दोन्ही परिचारिकांची भंडारा आणि गडचिरोली येथे मार्च २०१७ मध्ये बदली झाली. परंतु, काही दिवसांत बदली रद्द करून दोन्ही परिचारिकांचे पुन्हा मनोरुग्णालयात पुनर्वसन करण्यात आले. कोणत्याही बदल्या झाल्यानंतर इतक्‍या कमी वेळात बदली रद्द होत नाही. परंतु, दोन्ही परिचारिकांची बदली रद्द करण्याची जणू घाई सार्वजनिक आरोग्य विभागाला झाल्याचे दिसून येते.

‘त्या’ सहयोगी प्राध्यापकांच्या बदलीचे काय? 
सार्वजनिक आरोग्य विभागाप्रमाणे वैद्यकीय शिक्षण विभागातही बदल्यांचे धोरण राबविण्याचे संकेत शासनाने दिले होते. पंधरा वर्षे एकाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेले सहयोगी प्राध्यापक डॉक्‍टरांची यादी वैद्यकीय संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी मागवली होती. शंभरावर सहयोगी प्राध्यापकांची यादी तयार झाली. यादीतील प्रत्येक सहयोगी प्राध्यापकाला बदलीचे संकेत दिले. इच्छा असलेले ठिकाण लिहून पाठविण्याची संधी दिली. परंतु, पुढे दोन महिने लोटूनही एकाही सहयोगी प्राध्यापकाची बदली झाली नाही. मात्र, अधिष्ठाता आणि मर्जीतील प्राध्यापकांची बदली करण्याचा अफलातून प्रकार वैद्यकीय शिक्षण विभागाने केला.

Web Title: nagpur vidarbha news transfer cancel in two month