स्विफ्ट झाडाला धडकली; दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

टेकाडी (कन्हान) - कन्हान-तारसामार्गे बोरी शिवारात नागपूरवरून हिवरा (नरसाळा) येथे नातेवाइकांकडे चौदावीच्या कार्यक्रमाला जाणाऱ्या भरधाव स्विफ्टने मार्गालगतच्या झाडाला सोमवारी सकाळी ११ वाजता जबर धडक दिली. यात वाहनचालक सेवकराम हरीशचंद्र अलोणे (वय ५०, रा. इंदिरानगर, नाशिक) आणि मंदा दिलीप बघमारे (वय ५०, रा. हुडकेश्‍वर) यांचा मृत्यू झाला. 

माहितीनुसार, सेवकराम अलोणे (मूळ गाव हिवरा, मौदा) हे येथे ज्ञानेश्‍वर अलोणे या मोठ्या भावाच्या चौदावीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी सासुरवाडीत तातोबा नाकतोडे (रा. धनगौळी, नागपूर) यांच्याकडे पोहोचले. लक्ष्मण शिकारी (वय ५७), तातोबा नाकतोडे (वय ६५), मंदा बघमारे यांना अलोणे यांनी नागपूरवरून आपल्या साळ्याच्या मारुती स्विफ्ट या गाडीमध्ये घेतले. त्यानंतर ते हिवऱ्याकडे निघाले होते. दरम्यान, सकाळी ११ च्या सुमारास बोरी बसस्थानकानजीक गाडीचालक अलोणे यांनी एका ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात चालकाचे गाडीवरून संतुलन गेले. गाडी रस्त्याच्या कडेला एका बाभळीच्या झाडाला जाऊन धडकली. यात मंदा बघमारे यांच्या डोक्‍याला मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत झाला. घटनेनंतर कन्हान पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. जखमी व मृत गाडीमध्ये फसले असल्याने पोलिसांना त्यांना गाडीबाहेर काढण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. त्यानंतर जखमींना कामठी येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचारादरम्यान सेवकराम अलोणे यांच्या छातीला जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातातील दोन्ही मृतांना शासकीय रुग्णालय कामठी येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. जखमी लक्ष्मण शिकारी यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपुरातील मेडिकल येथे रेफर करण्यात आले. तर तातोबा नाकतोडे यांच्यावर कामठीत उपचार सुरू आहेत. वृत्त लिहिस्तोवर कन्हान पोलिस ठाण्यामध्ये प्रकरण दाखल झालेले नव्हते.

Web Title: nagpur vidarbha news two death in swift car accident