नारी डेपोतील दोन हरणे घुसली वस्तीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

नागपूर - कोराडी रोडवरील नारी डेपोमधील दोन हरणे शहरातील नालंदानगर आणि पाटणकर चौक परिसरातील आल्याने कुत्र्यांनी त्यांचा पाठलाग केला. दोन्ही हरणांवर त्यांनी हल्ला केल्याने ते जखमी झाले आणि जीव वाचविण्यासाठी सिमेंटच्या घरात घुसले. दोन्ही हरणांचा जीव वाचला. मात्र, तिसऱ्या हरणाचा कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला. 

कोराडी रोडवरील नारा डेपोमध्ये अनेक वर्षापासून हरणांचे अस्तित्व आहे. पूर्वी कोराडी आणि खापरखेडा या गावालगतच्या जंगलाचा भाग या परिसराशी जुळला होता. शहरातील वाढलेल्या लोकवस्तीमुळे नारा डेपोच्या शेजारी मोठ्या प्रमाणात सिमेंटचे जंगल उभे झाले. त्यामुळे या परिसरातील हरणे येथेच अडकले. त्यातील तीन हरणे सोमवारी रात्रीच्या सुमारास नागरी वस्तीत शिरले.

हरणे दिसताच भटकी कुत्री त्यांच्या मागे धावली. त्यामुळे हरणांनी धूम ठोकली. यातील तीन हरणे कुत्र्यांच्या तावडीत सापडले. इतर जंगलाच्या दिशेने गेले. त्यातील दोन हरणांनी नारी मार्गावरील नालंदा नगरामधील प्रकाश डोंगरे यांच्या घरी आश्रय घेतला. एक हरणाने पाटणकर चौकातील रंगारी यांच्या घरी सहारा घेतला. सकाळी उठल्यानंतर या दोन्ही परिवारांना हरीण आपल्या आवारात असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. वनखात्याची रेस्क्‍यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि हरिणांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगावर किरकोळ जखमा आढळून आल्याने उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर दोनही हरणांना गोरेवाडा जंगलात सोडण्यात आले. एक हरीण मात्र नारा डेपो परिसरात कुत्र्यांच्या हल्ल्यात मरण पावल्याचे आढळले. ट्रान्झिट ट्रीटमेन्ट सेंटरमध्ये वैद्यकीय तपासणी करून अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: nagpur vidarbha news two deer in public place