गाळमुक्तमुळे ५८ हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

२९ धरणांतून गाळाचा उपसा - विहिरींच्या पाणीपातळीत वाढ
नागपूर - तलाव, धरणे यातील गाळाचा उपसा करून त्याची सिंचनक्षमता वाढविण्यासाठी शासनातर्फे यावर्षी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान राबविले. यामुळे नागपूर जिल्ह्यातील ५८ हेक्‍टर शेतीला संरक्षित सिंचनाची सोय झाली.

२९ धरणांतून गाळाचा उपसा - विहिरींच्या पाणीपातळीत वाढ
नागपूर - तलाव, धरणे यातील गाळाचा उपसा करून त्याची सिंचनक्षमता वाढविण्यासाठी शासनातर्फे यावर्षी गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान राबविले. यामुळे नागपूर जिल्ह्यातील ५८ हेक्‍टर शेतीला संरक्षित सिंचनाची सोय झाली.

जलयुक्त शिवार अभियानामुळे संरक्षित सिंचन आणि भूजलपातळीत वाढ होण्यास मोठी मदत झाली. बऱ्याच गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जाण्याचे संकट टाळण्यास मदत झाली. त्याच पार्श्‍वभूमीवर शासनाने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान राबविले. अल्पावधीत या अभियानामुळे भूजलपातळीत वाढ आणि शेतीला संरक्षित सिंचनाची सोय झाली. शिवाय काढलेला गाळ शेतकऱ्यांना नि:शुल्क उपलब्ध करून दिल्याने जमिनीची सुपीकता वाढविण्यास मदत झाली. जिल्ह्यातील १३ तालुक्‍यांत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार कार्यक्रम सर्व अभिकरणामार्फत राबविण्यात आला. जिल्हा परिषद लघुसिंचन विभागामार्फत जूनअखेरपर्यंत २९ धरणातून गाळ काढण्यात आला. त्यात ७३ हजार २१५ घनमीटर गाळ काढण्यात आला. या गाळामुळे त्याचा १७१ शेतकऱ्यांना लाभ मिळाला. उबगी पाझर तलावातून ३० हजार १०० घनमीटर गाळ काढून २७ शेतकऱ्यांनी स्वखर्चाने स्वत:च्या पडीक शेतात टाकून जवळपास ५८ हेक्‍टर पडीक जमीन सुपीक केली. याकरिता सरपंच रितेश परवडकर, उपविभागीय अभियंता जी. के. व्ही. राव यांनी पुढाकार घेतला. 

या कामामुळे ३० टीसीएम अतिरिक्त जलसाठा निर्माण झाला. शिवाय पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीला तसेच आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरींची पाणीपातळी वाढविण्यास निश्‍चितच मदत होणार आहे. जिल्ह्यात हे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता सहारे, जी. के. व्ही. राव, बी. व्ही. सयाम, एस. एस. खरात, आर. एच. गुप्ता, पी. जी. भूत यांनी गाळमुक्त शिवार योजना राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केलेत.

Web Title: nagpur vidarbha news Under the irrigation of 58 hectare area due to sludge