आम्ही रोखणार जलप्रदूषण

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑगस्ट 2017

सकाळ एनआयईचा उपक्रम - गजानन विद्यालयाने दिला संदेश
नागपूर - जलप्रदूषण सर्वांत चिंतेची बाब झाली आहे. उत्सवांच्या काळात विसर्जनासाठी जलाशयांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. आता उत्सव साजरा करताना प्रदूषणाबाबतही काळजी घेण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. यासाठी सकाळ एनआयईतर्फे इको फ्रेंडली गणेशमूर्ती निर्मितीचा उपक्रम शाळा-शाळांमधून राबविल्या जात आहे. शनिवारी न्यू सुभेदार येथील श्री गजानन विद्यालय येथे आयोजित कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून सुंदर व आकर्षक गणेशमूर्ती तयार करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला.

उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या कार्यशाळेत विद्यालयातील पाचवी ते आठवीतील १९० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दृष्टी सामाजिक संस्थेचे पारस देशकर यांनी विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती तयार करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.

त्यांच्या चमूतील दीपक गिरमे, सौरभ कुंटेवार, भाग्यश्री जैन, भगवान कोलते, दीपाली शिखरामे, भूषण शिखरामे यांनी सहकार्य केले. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक विजय शहाकार, पर्यवेक्षक अरविंद पांडे, शिक्षक महेंद्र मोहेकर, अशोक कुंटलवार, प्रमोद पौरकर, परमानंद शेंदूरकर, नीलेश चौधरी, पूजा वलोकर, रमा मांडवे, ज्योती ससनकर, मनीषा खाडे, माधुरी बोरकर उपस्थित होते.

नगरसेविका तसेच महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती श्रद्धा पाठक व पर्यवेक्षक अरविंद पांडे यांच्या हस्ते उत्कृष्ट गणेशमूर्ती तयार करणारे विद्यार्थी तुलिका देशभ्रतार (प्रथम), कार्तिक भुजाडे (द्वितीय), कुणाल नेहारे (तृतीय) यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

सकाळ एनआयईची सभासद नोंदणी
शालेय विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता असलेल्या सकाळ एनआयईच्या सभासद नोंदणीला सुरुवात झाली आहे. नोंदणीशुल्क दीडशे रुपये आहे. सभासदत्व मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना ओळखपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. शिवाय सकाळ एनआयईचे अंक व विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी ९१३००९७५११ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधता येईल.

सकाळ एनआयईच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक व आध्यात्मिक विकास होत आहे. सध्या वाढते जलप्रदूषण चिंतेची बाब आहे. इको फ्रेंडली मूर्तीमुळे जलप्रदूषण रोखले जाऊ शकते. याशिवाय या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सांघिक गुणांना वाव मिळतो. सकाळने हा उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणात राबवावा.
- अरविंद पांडे, पर्यवेक्षक, गजानन विद्यालय 

Web Title: nagpur vidarbha news We will prevent water pollution