कधी लागणार बीएडचा निकाल?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सुरू केलेली ‘रिझल्ट एक्‍स्प्रेस’ आता थंडावली आहे. यामुळे ४५ दिवसांच्या आत निकाल लावण्याचा दावा करणाऱ्या  विद्यापीठाने ८० दिवस लोटूनही बीएडचा निकाल अद्याप लावलेला नाही. यामुळे विद्यार्थी चिंतित असून, विद्यापीठाच्या मूल्यांकन प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

विद्यापीठाने मागील तीन वर्षांपासून ऑनलाइन मूल्यांकन पद्धतीचा स्वीकार केला. याचा परिणाम म्हणून ४५ दिवसांच्या आधीच अनेक परीक्षांचे निकाल हाती येत आहेत. काही परीक्षांचे निकाल तर पंधरा दिवसांच्या आतही लागले आहेत. त्यामुळे अनेक वर्षांपासून घसरलेली निकालाची गाडी रुळावर आल्याचे बोलले जाते. मात्र, बीएड या एकवर्षीय अभ्यासक्रमातील अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल ८० दिवस उलटूनही लागलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील तीन वर्षांपासून बीएड अभ्यासक्रम हा दोन वर्षांचा झाला. तर परीक्षा पद्धतीमध्येही बदल करण्यात आला आहे. निकालासंदर्भात विचारणा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा भवनला भेट दिली असता प्रात्यक्षिक परीक्षेचे गुण आलेले नाहीत, असे सांगण्यात आले. जुन्या अभ्यासक्रमाचा निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

विद्यार्थी अडचणीत
एक वर्षीय अभ्यासक्रमात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुन्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा देण्याची ही शेवटची संधी होती. त्यानुसार विद्यापीठात अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. ही परीक्षा ७ एप्रिल २०१७ रोजी संपली. ८० दिवस उलटूनही निकाल हाती आलेला नाही. त्यातच बीएड दोन वर्षीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा अर्ज भरण्याला सुरुवातही झाली आहे. यामुळे जुन्या अभ्यासक्रमातील विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असल्यास त्यांना नवीन अभ्यासक्रमानुसार अर्ज करावा लागणार आहे. मात्र, निकाल लवकर न लागल्यामुळे विद्यार्थ्यांच्या हातून ही संधीही निघून जाण्याची भीती आहे.

Web Title: nagpur vidarbha news When will the results of BEd?