झेंडूने खाल्ला भाव!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 सप्टेंबर 2017

नागपूर - दसऱ्याच्या निमित्ताने झेंडूला येणारी मागणी लक्षात घेऊन नागपुरात आज मोठ्या प्रमाणावर झेंडूची आवक झाली. मात्र झेंडूला मागणीही चांगली राहिल्यामुळे झेंडूचे दर कडाडले आहेत. नवरात्र प्रारंभानंतर सुरुवातीचे तीन-चार दिवस झेंडूचे दर सुमार होते. मात्र, बुधवारपासून 60 ते 120 रुपये प्रतिकिलो या दराने झेंडू विकला जात आहे. अष्टमीपासूनच भाववाढीला सुरुवात झाली.

दसऱ्याला झेंडूच्या फुलांची मोठी आवक बाजारात होते. एरवी 40 ते 50 रुपये किलोने विकला जाणारा झेंडू दसऱ्याच्या दिवशी चांगलाच भाव खातो. यंदा पाऊस चांगला झाल्याने झेंडूसह सर्व फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. चांगल्या प्रतीच्या झेंडूची प्रतिकिलो 80 ते 120 रुपये दराने विक्री सुरू होती.

नवरात्रोत्सवात विशेषत: दसऱ्याच्या दिवशी झेंडूला मोठी मागणी राहते. मात्र, झेंडू काढणीच्या वेळी गेले दोन दिवस नागपूर जिल्ह्यात पाऊस नसल्याने बाजारात विक्रीसाठी झेंडू आला आहे. शहरात जिल्ह्यातील विविध तालुक्‍यांसह 250 किलोमीटरच्या जिल्ह्यांतून झेंडू महात्मा फुले मार्केटमध्ये विक्रीसाठी आलेला आहे. शेतकऱ्यांना अपेक्षेएवढा भाव मिळाला आहे, असे फुलविक्रेते जयंत रणनवरे यांनी सांगितले.

फुलबाजार अंधारात
महात्मा फुले फुलबाजार असोसिएशन दिवाळी आणि दसऱ्याच्या दरम्यान रात्री उशिरापर्यंत फुलबाजार सुरू राहत असल्याने विजेची मागणी करीत असतात. त्यानुसार यंदाही असोसिएशनने विजेची मागणी केली होती. मात्र, फुलबाजार असोसिएशनमध्ये दोन गट निर्माण झाल्याने महावितरण कंपनीने वीजपुरवठा केला नाही. त्यामुळे शुक्रवारी फुलबाजार अंधारात होता. त्यामुळे शेतकऱ्यांची काही व्यापाऱ्यांनी फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे.

Web Title: nagpur vidarbha news zendu rate increase