मोबाईल चोरल्याच्या संशयावरून खून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

नागपूर/वाडी - मोबाईल चोरल्याच्या वादातून दोघांनी मित्रांचा दारू पाजल्यानंतर दगडाने ठेचून खून केला. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. निखिल सुधाकर भांगे (वय २९, लावा, खडगाव रोड, वाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. योगेश ऊर्फ बाबू बिसेन (२८, मेघराजनगर, टेकडीवाडी वाडी) आणि पंकज कुथे (२८, स्मृतिनगर दत्तवाडी) अशी आरोपींची नावे असून त्यांना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली.

नागपूर/वाडी - मोबाईल चोरल्याच्या वादातून दोघांनी मित्रांचा दारू पाजल्यानंतर दगडाने ठेचून खून केला. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. निखिल सुधाकर भांगे (वय २९, लावा, खडगाव रोड, वाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. योगेश ऊर्फ बाबू बिसेन (२८, मेघराजनगर, टेकडीवाडी वाडी) आणि पंकज कुथे (२८, स्मृतिनगर दत्तवाडी) अशी आरोपींची नावे असून त्यांना गिट्टीखदान पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल भांगे हा केबल ऑपरेटर म्हणून काम करीत होता. मात्र, गेल्या सहा महिन्यांपूर्वी त्याचे काम सुटले होते. बेरोजगार असलेल्या निखिलला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे रात्रीबेरात्रीपर्यंत तो दारू पिऊन पडलेला राहत होता. मंगळवारी रात्री निखिलला योगेशचा फोन आला आणि तो घरातून बाहेर पडला. दोन्ही आरोपींची निखिलशी मैत्री होती. ते तिघेही पलांदूरकर ले-आउट, दाभा येथील पाण्याच्या टाकीजवळ गेले. तेथे तिघांनीही दारू ढोसली. काही दिवसांपूर्वी योगेशचा मोबाईल चोरी गेला होता.

तो मोबाईल निखिलने चोरल्याचा योगेशला संशय होता. मात्र, निखिलने मोबाईल चोरल्याचा इन्कार केला होता. मात्र, योगेश आणि पंकज यांनी चोरलेला मोबाईल परत करण्याबाबत दबाव टाकला. या कारणावरून चिडलेल्या निखिलने अश्‍लील शिवीगाळ केली. त्यांच्यात वाद झाल्याने आरोपींनी मद्यधुंद असलेल्या निखिलच्या डोक्‍यात दगड घालून खून केला आणि पळ काढला. या प्रकरणी निखिलचा भाऊ आशीष भांगेच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आणि आरोपींना अटक केली. 

प्रेमसंबंधामुळे चर्चित होता निखिल
निखिल हा अविवाहित होता. त्याचे वस्तीतील एका युवतीवर प्रेम होते. तिचे नावही त्याने हातावर गोंदवले होते. मात्र, तिने निखिलशी लग्नाच्या आणाभाका घेतल्यानंतरही लग्नास नकार दिला होता. तेव्हापासून त्याला दारूचे व्यसन लागले होते. यापूर्वी त्याने प्रेयसीच्या विरहात हातावर ब्लेडने चिरे मारून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता, अशी माहिती गिट्टीखदान पोलिसांनी दिली.
 

पत्रिकेमुळे पटली निखिलची ओळख
निखिलचा दगडाने ठेचून खून केल्यानंतर आरोपींनी पळ काढला. बुधवारी सकाळी एका मॅटेडोरचालकाला निखिलचा मृतदेह दिसून आला. त्याने पोलिसांना सूचना दिली. पोलिसांना घटनास्थळावर वाढदिवसाच्या निमंत्रणाची पत्रिका दिसली. ती पत्रिका निखिलचे शेजारी लोखंडे यांच्या मुलाच्या वाढदिवसाची होती. पत्रिकेवरून लोखंडे यांना पोलिसांनी चौकशी केली असताना त्यांनी मृत निखिलची ओळख पटविली.

Web Title: nagpur vidarbha nikhil bhange murder