‘फॅसिलेटर’अभावी ‘एटीव्हीएम’ शोभेची वस्तू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

प्रवाशांची गैरसोय; अनारक्षित तिकीट केंद्रात जनरल तिकिटांसाठी लागतात रांगा
नागपूर - प्रशासनाने रेल्वेस्थानकांवर जनरल तिकिटांसाठी ‘एटीव्हीएम’ उपलब्ध करून दिल्या. यामुळे जनरल तिकिटांसाठी रांगेत लागण्याच्या त्रासापासून प्रवाशांना सुटका मिळेल, असा दावा केला होता. प्रत्यक्षात मात्र फॅसिलेटरच नसल्याने तिकिटांसाठी लावलेले यंत्र शोभेची वस्तू ठरले असून, प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.

रेल्वेत आरक्षित तिकिटांच्या तुलनेत जनरल तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. जनरल तिकिटासाठी लांब रांगा लागल्याचे दिसून येते. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एटीव्हीएमचा पर्याय उपलब्ध करून दिला. 

या यंत्रातून तिकीट देण्यासाठी रेल्वेच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना फॅसिलेटर म्हणून जबाबदारी दिली. निवृत्तीनंतरही गरजू कर्मचाऱ्यांना नियमित उत्पन्न मिळावे, हा त्यामागील हेतू होता. 

प्रारंभी एटीव्हीएमला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र, अलीकडे फॅसिलेटरच उपस्थित राहत नसल्याने प्रवाशांना रांगेत लागूनच तिकीट मिळविण्याशिवाय पर्याय नाही. अनारक्षित तिकीट केंद्रात प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात; तर एटीव्हीएमसमोर शुकशुकाट असतो.

योग्य उपाययोजना करण्याची गरज
लागोपाट चार सुट्या आल्यामुळे अनेकांनी फिरायला जाण्याचा बेत आखला आहे. शिवाय गोकुळाष्टमीसाठी गावाकडे जाणाऱ्यांचीही संख्या मोठी आहे. यामुळे शनिवारी नागपूर रेल्वेस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. प्रवाशांना अनारक्षित तिकिटासाठीही रांगेत लागून मनस्ताप सहन करावा लागला. प्रवासी सुविधांच्या बाता करून स्वत:ची पाठ ठोपटून घेणाऱ्या रेल्वे प्रशासनानेच एटीव्हीएम नेहमी सुरू राहण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे.

Web Title: nagpur viddarbha news The 'ATVM' ornaments for 'Fascilar'