esakal | "इनोव्हेशन'ने नागपूर जागतिक दर्जाचे होणार
sakal

बोलून बातमी शोधा

"इनोव्हेशन'ने नागपूर जागतिक दर्जाचे होणार

"इनोव्हेशन'ने नागपूर जागतिक दर्जाचे होणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा
नागपूर : युवा संशोधकांच्या चांगल्या कल्पनांचा शहराच्या विकासासाठी वापर केला जाणार आहे. इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्यासाठी 18 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून इनोव्हेशन पर्वाच्या माध्यमातून नागपूरला जागतिक दर्जाचे शहर बनविण्यासाठी मानस असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या नागपूर महानगरपालिका आणि मेयर इनोव्हेशन कौन्सिलच्या संयुक्त विद्यमाने मानकापूर स्टेडियम येथे आयोजित "इनोव्हेशन पर्व-2'चे उद्‌घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार तर यावेळी मंचावर सार्वजनिक बांधकाम, वने व आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. परिणय फुके, ओबीसी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अविनाश ठाकरे, आमदार सुधाकर देशमुख, गिरीश व्यास, सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, महामेट्रोचे प्रबंध संचालक ब्रृजेश दीक्षित, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, मेयर इनोव्हेशन कौन्सिलचे समन्वयक डॉ. प्रशांत कडू, इनोव्हेशन पर्वचे मुख्य समन्वयक केतन मोहितकर आदी उपस्थित होते.
loading image
go to top