नागपूरला भयमुक्‍त शहर करणार

डॉ. भूषणकुमार उपाध्याय
डॉ. भूषणकुमार उपाध्याय

नागपूरला भयमुक्‍त शहर करणार
नागपूर : नागपुरातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षित वातावरण तयार करून देणे तसेच भयमुक्‍त नागपूर बनविण्याचा प्रयत्न केला जाईल. पोलिसांच्या कारवाईवर संशय येऊ नये यासाठी सर्व प्रक्रिया पारदर्शकता केली जाईल, अशी ग्वाही पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली.
पत्रकार संघाच्या वतीने प्रेस क्‍लबमध्ये आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. सुरक्षित शहर असा ठसा उमटविण्यासाठी महिला, ज्येष्ठ, युवती व विद्यार्थिनींच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांना शिक्षा करण्यासाठी कटिबद्ध आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथकाला पुनरुज्जीवित करण्यात येईल. पोलिस ठाण्यात अनेकदा कर्मचारी तक्रारदार आणि नागरिकांशी उद्धटपणे वागतात. त्यामुळे पोलिस विभागाची प्रतिमा मलिन होते. परंतु, ठाणेदारांना सूचना देऊन यामध्ये सुधारणा करण्यावर भर आहे. ऑपरेशन क्रॅकडाऊन, कोम्बिंग ऑपरेशन आणि नाकाबंदी सातत्याने करीत गुन्हेगारी कमी करण्यात येईल, असेही डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले.
वाहतूक व्यवस्था कळीचा मुद्दा
शहरातील विस्कटलेली वाहतूक ताळ्यावर आणण्यासाठी खूप प्रयत्न करीत आहेत. पोलिस वाहतूक नियंत्रित करण्याऐवजी झाडाखाली वसुली करीत उभे राहण्याचे प्रकार बंद होतील. चौकात उपस्थित नसलेल्या कर्मचाऱ्यांची नोंद घेण्यासाठी विशेष पथक तयार केले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही.
क्राईम सिटी ओळख नाही
नागपूरला क्राईम सिटी म्हणून ओळख असल्याचा दावा पूर्णपणे फोल आहे. नागपूरपेक्षा अन्य आयुक्‍तालयात गुन्हेगारी जास्त आहे. परंतु, शहरातील गुन्हेगारी संपविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. क्रिकेट सट्टेबाजी, जुगार, वरली-मटका आणि दारूविक्री बंद करण्यासाठी सातत्याने छापेमारी केली जाईल.
सायबर क्राईम विभाग सशक्‍त
शहरातील वाढती सायबर गुन्हेगारी पाहता अत्याधुनिक तंत्रप्रणाली आणि मशीन्स उपलब्ध करून देण्यात येणार. सायबर क्राईमचा स्टाफ वाढविण्यात येईल. तसेच इकोनॉमिक विंगच्या माध्यमातून संपत्तीविषयक गुन्ह्यांचा तपास हायटेक पद्धतीने केला जाईल.
शहरी नक्षलवाद संपवू
नक्षलवाद शहरात घुसू पाहत आहे. त्यामुळे पोलिस आणखी सतर्क झाले आहेत. नक्षलवाद्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे. अँटी नक्षल सेल तसेच पोलिसांचे चक्रव्यूव्ह रचून आहेत. जेव्हा गरज पडेल पोलिस कारवाई करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com