नागपूर : दारूच्या दुकानाला महिलांचा ‘ना’; ठिय्या आंदोलन सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vidarbha

नागपूर : दारूच्या दुकानाला महिलांचा ‘ना’; ठिय्या आंदोलन सुरू

जलालखेडा : नरखेड तालुक्यातील सावरगाव येथील वॉर्ड क्रमांक २ मध्ये देशी दारूचे दुकान नुकतेच सुरु करण्यात आले. हे दुकान सावरगाव - नरखेड या मुख्य रस्त्यावर असून त्याच्या जवळपास खंडेश्वर महाराज मंदिर, न्यू माउंट कॉन्व्हेंट, शिंदे शेतकी महाविद्यालय, मंगल कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र हे धार्मिक तथा सामाजिक प्रतिष्ठाने आहेत. नागरिकांची दाट वस्ती असून तेथील या देशी दुकानांमुळे शांतता भंग होऊ शकते. गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वावर वाढू शकते. तरुणांमधील व्यसनधिनातेचं प्रमाण वाढू शकते. त्यामुळेच रहिवाश्यांवर, त्यांच्या कुटुंबावर, समाजावर विपरीत परिणाम होणार याची जाणीव झालेल्या शेकडो महिलांनी दुकान सुरु झाल्यापासून ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली आहे.

सावरगाव येथील भरवस्तीत सुरु झालेले देशी दारूचे दुकान गाव प्रशासनाला कोणतीही सूचना न देता सुरु झालेच कसे? ज्या ठिकाणी दुकान सुरु झाले तो प्लॉट अकृषक झाला नसतानाही परवानगी मिळालीच कशी? तसेच रहिवाश्यांच्या कुटुंबावर, कुटुंबातील मुख्य व्यक्तीवर दुष्परिणाम होणार हे नकीच आहे. त्यामुळे परिसरातील महिलांनी देशी दारूचे दुकान सुरु करण्यास मनाई नाही.

तर ते इतरत्र हलविण्यात यावे, यासाठी जिल्हाधिकारी, काटोलचे उपविभागीय अधिकारी, नरखेडचे तहसीलदार, नरखेडचे पोलिस निरीक्षक यांना निवेदने देण्यात आली. परंतु प्रशासनाची निष्काळजीपणा, दुकान चालकाचा अट्टाहस पाहून परिसरातील महिला बेभान झाल्या आहेत. प्रशासन कोणतीही कार्यवाही करतांना दिसून येत नाही. त्यामुळे देशी दारूच्या दुकानासमोरच महिलांनी मंडप टाकून बैठ्या आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलनाचा मंगळवारी( ता. २३ ) ९ वा दिवस असून कोणतीही शासकीय कार्यवाही न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराहीं महिलांनी दिला आहे.

हेही वाचा: नागपूर : दारू पिण्यास मनाई केल्याने पतीची आत्महत्या; प्रेमविवाहाचा करूण अंत

बैठ्या आंदोलनाला शिलाबाई शेषराव खोडे, सरू भीमराव ठोंबरे, इंदुबाई धनराज रेवतकर, कौतिका मेघराज काळबांडे, शोभा सोनीराम हिरुडकर, कल्पना विजय नासरे, कमलाबाई भगवान नासरे, लक्ष्मी विनायक ठोंबरे, मंगला रामकिसन ठोंबरे, सुमन संजय नासरे, चंद्रभागा शामराव ठोंबरे, अनुसया शिवाजी नासरे, पुष्प नामदेव नासरे, काजल मुरलीधर मेटांगले यांच्यासह अनेक महिलांचा समावेश आहे.

परिसरात देशी दारूचे दुकान सुरु करण्याला आमचा कोणताही विरोध नाही, परंतु हे दारूचे दुकान इतरत्र हलविण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. दारूचा परिणाम आम्ही डोळ्यासमोर पाहत आहोत व यातना भोगत आहोत. त्यामुळे प्रशासनाने महिलांच्या निवेदनाचा विचार करावा.

- रेखा विजय गाण. गृहिणी, सावरगाव

हेही वाचा: Pune : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या कंगनावर गुन्हा दाखल करावा

ग्रामपंचायत कार्यालयास वॉर्ड क्र. १, २, ३ तसेच ५ येथील रहिवासी महिलांनी वॉर्ड क्र. २ मध्ये सावरगाव -नरखेड रस्त्यावर देशी दारूचे दुकान सुरु करण्यास मनाई करण्यात यावी. अश्याच स्वरूपाचा अर्ज प्राप्त झाला आहे. त्यामुळे स्थानिक महिलांची मागणी पूर्ण व्हावी. त्यामुळे आंदोलन करणाऱ्या महिलांना माझा पूर्ण पाठिंबा आहे.

- प्रगती नत्थूजी ढोणे, सरपंच, सावरगाव

loading image
go to top