निवडणूक कार्यक्रम : १९ जुलैला नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक

निवडणूक कार्यक्रम  : १९ जुलैला नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक

नागपूर : नागपूर, अकोला, वाशीम, नंदूरबार व धुळे या पाच जिल्हा परिषदांच्या निवडणुका (Zilla Parishad elections) १९ जुलै रोजी होणार आहेत. तसेच २० जुलै रोजी मतमोजणी (Counting on July 20) आणि २३ जुलै रोजी निवडून आलेल्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने कोरोना नियमांचे पालन करून निवडणूक घेण्याची अधिसूचना मंगळवारी (ता. २२) प्रसिद्ध केली आहे. कोरोनामुळे निवडणुकीला दोन महिने स्थगिती देण्यात आली होती. आता राजकीय नेतेमंडळी निवडणुकीच्या रणांगणात उतरणार आहेत. (Nagpur-Zilla-Parishad-elections-on-July-19)

वाढत्या कोरोनामुळे निवडणुकीला दोन महिने स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे मागील काही दिवसांपासून उपरोक्त पाच जिल्हा परिषदांमध्ये सुरू असलेला राजकीय आखाडा तूर्त शांत झालेला होता. या पाच जिल्हा परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांहून अधिक झाले होते. त्यामुळे तेथील नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) जागांवरील निवडणुका रद्द करून तेथे नव्याने निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

निवडणूक कार्यक्रम  : १९ जुलैला नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक
कोविडनंतर लैंगिकविकाराची समस्या; वाचा काय सांगतात डॉ. चक्करवार

त्यानुसार, नागपूर जिल्हा परिषदेतील ५८ पैकी ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या १६ जागांवरील निवडणुका रद्द करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. नागपूर जिल्हा परिषदेतील ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या १६ पैकी ४ जागा अतिरिक्त ठरल्या होत्या. नागपूर जिल्हा परिषदेच्या १६ जागांवर फेरनिवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे. राज्य निवडणूक आयोगाने कोरोना नियमांचे पालन करून निवडणूक घेण्याची अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध केली आहे.

निवडणूक कार्यक्रम  : १९ जुलैला नागपूर जिल्हा परिषदेची निवडणूक
नागपुरातील वाकी येथे चौघांना जलसमाधी; पोहण्याचा मोह बेतला जिवावर
कोरोना थोडाफार कमी झालेला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा घोषित केलेल्या आहेत. आम्ही आधीपासूनच कामाला लागलो आहे. परंतु, आता खऱ्या अर्थाने प्रचाराला गती येईल.
- चंद्रशेखर चिखले, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद

(Nagpur-Zilla-Parishad-elections-on-July-19)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com