Shinde Fadnavis Govt : राज्य सरकारचे शिक्षकांसाठी ११६० कोटींचे पॅकेज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shinde Fadnavis Govt

Shinde Fadnavis Govt : राज्य सरकारचे शिक्षकांसाठी ११६० कोटींचे पॅकेज

नागपूर : राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने ११६० कोटीच पॅकेज जाहीर केले. याचा ६० हजार शिक्षकांना लाभ होणार असल्याचे भाजपा शिक्षक आघाडीचे नागपूर विभागीय संयोजक अनिल शिवणकर यांनी सांगितले.

गेल्या आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षकांच्या मागण्यांवर विचार करून हे पॅकेज जाहीर केले. अघोषित शाळांना अनुदान घोषित करावे,२० टक्के व ४० टक्के शाळांना पुढचा टप्पा घोषित करावा यासाठी शिक्षक आझाद मैदानात ४० दिवसापासून आंदोलन करीत होते. याच मागणीसाठी भाजप शिक्षक आघाडीतर्फे शासनासोबत सतत पाठपुरावा सुरू होता.

याआधी सुद्धा युती शासनाने अनुदानाची तरतूद केली होती. आताही शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे अनेक वर्षापासून वेतनापासून वंचित असलेल्या महाराष्ट्रातील ६० हजार शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला. परंतु, १०० टक्के अनुदान मिळेपर्यंत हा लढा सुरू राहील, असेही अनिल शिवणकर यांनी सांगितले.