१६ महिन्यांत १२२ महिलांवर अत्याचार; वाढता ग्राफ आव्हानात्मक

१६ महिन्यांत १२२ महिलांवर अत्याचार; वाढता ग्राफ आव्हानात्मक

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे (coronavirus) लॉकडाऊन (lockdown) असला तरी शहरासह ग्रामीण भागातही गुन्हेगारी प्रवृत्तीचा ग्राफ वाढतच आहे (The graph of criminal tendencies is growing). १ जानेवारी २०२० ते ३० एप्रिल २०२१ या १६ महिन्यांच्या कालावधीत नागपूर ग्रामीण परिसरात १२० महिलांवर अत्याचाराच्या (Atrocities on 120 women) घटना पुढे आल्या. १२० गुन्हे उघड झाले असून याच कालावधीत एकूण ६५ पैकी ६२ हत्येचे प्रकरणे उघड झाली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचा वाढता ग्राफ पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे. त्यावर तात्काळ नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. (122-women-tortured-in-16-months-The-rising-graph-of-crime-is-challenging)

अल्पवयीन मुलींसह महिलांवर अत्याचाराच्या घटना सातत्याने पुढे येत आहे. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक उरलाय की नाही, अशीही परिस्थिती आहे. शहरात हत्येचे सत्र कायम असून ग्रामीण परिसराची परिस्थितीही वेगळी नाही. अनेक हत्या तर अगदी क्षुल्लक कारणांवरून घडल्याचे पुढे आले आहे. उपरोक्त कालावधीत एकूण ६५ हत्या झाल्या असून, यातील आतापर्यंत ६२ हत्यांचे प्रकरण पोलिसांनी उघडकीस आणले आहे. विनयभंग, लुटपाट, ठकबाजी, फसवणूक, चोरी, घरफोडी, विश्‍वासघात या घटना नियमितच सुरू असल्याने पोलिसांनी यावर अंकुश लावणे गरजेचे आहे.

१६ महिन्यांत १२२ महिलांवर अत्याचार; वाढता ग्राफ आव्हानात्मक
चार युवकांनी सुरू केला कचऱ्यापासून फर्निचर तयार करण्याचा प्रकल्प

लॉकडाउनमध्ये अनेकांचे रोजगार गेले. अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत सापडल्यामुळे गुन्हेगारी वृत्ती आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पोलिस विभागाकडून माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती मिळवली. त्यांना पोलिस उपअधीक्षक (गृह) तथा जनमाहिती अधिकारी (नागपूर ग्रामीण) संजय पुरंदरे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत ही माहिती उपलब्ध करून दिली आहे.

५६७ पोलिसांना कोरोनाची बाधा

कोरोना काळात कोविड योद्धा म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाने कवेत घेतले. या काळात एकूण ५६७ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यातील ५ पोलिसांचा मृत्यू झाला. तर या कालावधीत ११ पोलिसांचा ऑन ड्यूटी मृत्यू झाला आहे.

१६ महिन्यांत १२२ महिलांवर अत्याचार; वाढता ग्राफ आव्हानात्मक
Awareness : पर्यावरणाच्या रक्षणासाठी सुरभीने राबविले जनजागृती अभियान

१३० गुन्हेगारांना तुरुंगात टाकले

ग्रामीण भागात उपरोक्त कालावधीत घडलेल्या विविध प्रकरणांपैकी एकूण ४ हजार १२९ प्रकरणे ही निकाली काढण्यात आली आहे. तर १,१८२ प्रकरणे अद्यापही प्रलंबित आहेत. या काळात १३० गुन्हेगारांना तुरुंगात टाकण्यात आले आहेत.

(122-women-tortured-in-16-months-The-rising-graph-of-crime-is-challenging)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com