esakal | 113 जणांच्या मृत्यूने आठवला 'तो' काळा दिवस, १९ दिवसांत तब्बल १२८८ कोरोनाबळी

बोलून बातमी शोधा

corona dead body

113 जणांच्या मृत्यूने आठवला 'तो' काळा दिवस, १९ दिवसांत तब्बल १२८८ कोरोनाबळी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोनाच्या मृत्यूचे तांडव सुरूच असून, सोमवारी नागपुरातील स्मशान घाटांवर ११३ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नागपूरच्या मेयो, मेडिकलमधील शवविच्छेदन गृह हाऊसफुल्ल झाली आहेत. शव ठेवायला शवागारात जागा नाही. एप्रिल महिना जिल्ह्यावर कोरोना काळ बनून आला आहे. अवघ्या १९ दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाने १२८८ बळी घेतले आहेत, तर १ लाख ३ हजार ४३२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

हेही वाचा: मुंबईतील हेवीवेट मंत्र्यांना रेमडेसिव्हीर दिले, पण नागपूरसोबत भेदभाव - फडणवीस

नागपूर जिल्ह्यात मागील वर्षभरात ३ लाख २९ हजार ४७० कोरोनबाधित आढळून आले आहेत. यापैकी १ लाख ३ हजार ४३२ कोरोनाबाधित दुसऱ्या लाटेतील एप्रिल २०२१ मध्ये आढळले आहेत. तर आतापर्यंत झालेल्या ६ हजार ३६४ मृत्यूंपैकी २१८८ मृत्यू चालू महिन्यातील १९ दिवसात झाले आहेत. कोरोनाच्या मृत्यू साखळीत २०२० मध्ये सर्वाधिक मृत्यू सप्टेंबर महिन्यात झाले. १७ सप्टेंबरला ६४ तर १६ सप्टेंबरला ७४ या उच्चांकी मृत्यूंची नोंद झाली होती. मात्र, यानंतर कोरोनाच्या मृत्युसाखळीत खंड पडला. मृत्यूचा आलेख खाली आला. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मृत्यूचे नव्हेतर बाधितांच्या आकड्यांचेही तांडव नागपूर जिल्ह्यात सुरू केले. एका पाठोपाठ एक असे मृत्यूचे आणि बाधितांच्या आकड्यांचे नवे रेकॉर्ड तयार होत आहेत. पहिल्यांदा कोरोनाचे शतकापेक्षा अधिक बळी गेल्याची नोंद झाली. १२८८ मृत्यू आणि १लाख ३ हजार ४३२ बाधित १९ दिवसात आढळले.

हेही वाचा: 'वयात बसत नसताना फडणवीसांच्या पुतण्याला लसीचा दुसरा डोस मिळालाच कसा?'

गोवारी हत्याकांडाचा तो काळा दिवस ...

एकाच दिवशी ११३ जण मृत्यू पाहण्याची नागपूर जिल्ह्याची ही दुसरी घटना आहे. २७ वर्षांपूर्वी २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपुरातील टी-पॉइंटवर गोवारी हत्याकांड घडले होते. यात ११४ जणांचा मृत्यू झाला होता. यातील एक जण आढळून आला नव्हता. यामुळे नागपुरात ११३ शवांची महायात्रा या शहराने अनुभवली. नागपुरातील विविध श्मशानभुमीत ११३ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हक्क मागण्यासाठी आलेल्या गोवरींचा तो हक्काचा लढा होता. हक्कासाठी ते शहीद झाले होते. मात्र यावेळी कोरोनाच्या विषाणूने ११३ जीव घेतले आहेत.