Corona Update : नागपूर शहरात कोरोनाचे आज 3 बाधित

शहरात एच ३ एन २या एन्फ्लुएन्झा विषाणूची एकाला लागण झाल्याचे निदान
3 infected Corona today in Nagpur One case of H3N2 virus health doctor
3 infected Corona today in Nagpur One case of H3N2 virus health doctor sakal

नागपूर : शहरात एच ३ एन २या एन्फ्लुएन्झा विषाणूची एकाला लागण झाल्याचे निदान करण्यात आल्यानंतर शहर आणि परिसरात पुन्हा एकदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाने प्रवेश केला आहे. या घडामोडीत शहारातल्या काही भागांमध्ये स्वाइन फ्लूच्या रुग्णांची देखील नोंद करण्यात आली आहे.

3 infected Corona today in Nagpur One case of H3N2 virus health doctor
Corona Update : शहरात कोरोनाचे नवे रुग्ण;  महापालिकेची यंत्रणा सज्ज

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने घेतलेल्या नोंदिनुसार बुधवारी कोरोनाचे नव्या तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या खेरीज सौम्य लक्षणे असलेल्या १२ जणांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सध्या शहरात कोरोनाच्या १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

3 infected Corona today in Nagpur One case of H3N2 virus health doctor
H3N2 Virus : सावधान! पुण्यात वाढतोय H3N2 आजाराचा धोका, जाणून घ्या लक्षणे...

ही सगळी घडामोड सुरू असताना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतही (एम्स) फुफ्फुसांशी निगडीत व्याधी झालेल्या एका संशयिताचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे रुग्णाच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतरच या रुग्णाचा एच ३ एन २ने मृत्यू झाला की नाही याचे निदान होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com