Nagpur : रेशनिंगचा ४६५ पोते गहू काळ्याबाजारात; ३ धान्य तस्करांना अटक

शासकीय स्वस्त धान्य दुकान रेशनिंगमध्ये जाणारा गव्हाचा ट्रक चक्क काळ्याबाजारात जात असताना जरीपटका पोलिसांनी छापा घातला
arrested
arrestedsakal

नागपूर : शासकीय स्वस्त धान्य दुकान रेशनिंगमध्ये जाणारा गव्हाचा ट्रक चक्क काळ्याबाजारात जात असताना जरीपटका पोलिसांनी छापा घातला. पोलिसांनी ४६५ पोते गहू जप्त केला असून तीन धान्य तस्करांना अटक केली. गेल्या वर्षभरातील पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे. हरविंदरसिंह रविंदरसिंह भाटीया (२९), अमनसिंह रविंदरसिंह भाटीया (३३, पाटनकर चौक, तथागत कॉलनी), नसीम अकबर खान (२६, नाका नं.२, खसाळा-मसाळा) अशी अटकेतील धान्यतस्कराची नावे आहेत. तर लक्ष्मण नावाचा आरोपी फरार झाला.

arrested
'नवाब मलिक तुम्ही मुस्लिम आहात ना, मग...' फ्लेचर पटेल यांचं सडेतोड उत्तर

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरमिंदर, अमनसिंह आणि नसीम हे धान्य काळ्याबाजारात विक्री करणाऱ्या मोठ्या रॅकेटचे सूत्रधार आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेकदा काळ्या बाजारात रेशनचे धान्य विक्री केले आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्था प्रणालीच्या ट्रकमध्ये (एमपी २२ एच १९३१) जवळपास ४६५ पोते रेशनिंगचा गहू होता. तो ट्रक निर्धारित केलेल्या मार्गावरून सरकारी धान्य गोडावूनमध्ये नेण्यात येत होते. तिघांनी शुक्रवारी रात्रीच्या सुमारास तो ट्रक थेट पाटनकर चौक, तथागत कॉलनीत नेला.

तेथे अंधारात ट्रक उभा करून दुसरे टाटा एस वाहनात गव्हाचे पोते काढणे सुरू केले होते. दरम्यान ही माहिती जरीपटक्याचे ठाणेदार वैभव जाधव यांना मिळाली. त्यांनी लगेच झोनल अधिकारी रागिणी गायकवाड आणि धान्य पुरवठा निरीक्षक रविंद्र राठोड यांना सूचना देऊन पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर पोलिसांचे एक पथक तयार करून घटनास्थळावर रवाना झाले.

पोलिसांनी सापळा रचला आणि छापा घातला. त्यावेळी तिनही आरोपी ट्रकमधून गव्हाचे पोते टाटा एसमध्ये टाकताना रंगेहात पडकले. तिघांनाही अटक करण्यात आली असून लक्ष्मण नावाचा सहकारी अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. पोलिसांनी ४६५ पोते गव्हासह २६ लाख ५३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई आयपीएस मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनात पीआय वैभव जाधव, एपीआय विजय धुमाळ, रामचंद्र गजभे, गजानन निशितकर, अजय गिरडकर, आनंद म्हरसकोल्हे, संतोष पांडे, सुशील महाजन यांनी केली.

arrested
कोळसा संपला तर निम्मा भारत अंधारात? जाणून घ्या जगात साठा किती

शासकीय अधिकारी कनेक्शन

रेशनिंगचा गहू, तांदूळ किंवा दाळ काळ्याबाजारात विक्रीचे मोठे रॅकेट शहरात कार्यरत आहे. या रॅकेटचे मूळ यशोधरानगर आणि पाचपावलीत आहे. या परिसरातील धान्य व्यापारी हे काही शासकीय अधिकाऱ्यांना हातीशी धरून धान्याचा काळाबाजार करतात. त्यामुळे जरीपटका पोलिसांच्या हातात मोठे रॅकेट सापडण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com