esakal | अकरावीच्या ४७ हजारांवर जागा रिक्त, ऑनलाइन प्रवेशामुळे जागा रिक्त राहण्याचे संकट
sakal

बोलून बातमी शोधा

admissions

अकरावीच्या ४७ हजारांवर जागा रिक्त, ऑनलाइन प्रवेशामुळे जागा रिक्त राहण्याचे संकट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : अकरावी केंद्रीय प्रवेशाच्या (11th admission process) पहिल्या फेरीनंतर कला, वाणिज्य, विज्ञान आणि एमसीव्हीसी या चारही शाखांमधील ४७ हजार ८३ जागा रिक्त आहेत. त्यामुळे निकाल वाढीनंतर प्रवेशवाढीचे महाविद्यालयांचे स्वप्न भंगले आहे. पहिल्या फेरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत चारही शाखांमध्ये ५८ हजार ८७५ जागांमधून केवळ ११ हजार ७९२ जागांमध्ये प्रवेश घेतला.

हेही वाचा: लक्ष्मणची रेखा जगात भारी, जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत पटकाविला पहिला क्रमांक

अकरावी ऑनलाईन प्रवेशाची तात्पुरती यादी २३ ऑगस्टला प्रकाशित केली. यामध्ये २७ हजारांवर विद्याथ्र्यांनी नोंदणी केली होती. मात्र, यातून केवळ १७ हजार ९४४ विद्यार्थ्यांनीच महाविद्यालयांच्या पर्याय निवडला होता. त्यानुसार २७ ते ३० ऑगस्टपर्यंत प्रवेश देण्यात आला. त्यानंतरही काही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहिल्याने एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. मात्र, महाविद्यालयाचा पर्याय निवडूनही अनेक विद्याथ्र्यांनी अद्याप प्रवेश घेतलेला नाही. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रवेश असणाऱ्या विज्ञान शाखेमधीलही अनेक प्रवेश रिक्त आहेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे शहरी भागातील महाविद्यालयासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

या महाविद्यालयांना पसंती

श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय, डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी या काही नामवंत महाविद्यालयांनी प्रवेशाला पसंती दिली. यामुळे या महाविद्यालयांमध्ये पहिल्या फेरीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेता आला आहे.

शाखा प्रवेश क्षमता रिक्त जागा

  • कला १२१८ ८२०२

  • वाणिज्य ३०१२ १४७०८

  • विज्ञान ६९५४ २०७६६

  • एमसीव्हीसी ६०८ ३४०७

loading image
go to top