५ वर्षाच्या चिमुकलीची कोरोनाशी फाईट, मायलेकीने घरातच उपचार घेत केली मात

rayra and roshani meshram
rayra and roshani meshrame sakal

नागपूर : कोरोना झाला की घाबरून अवसान गाळणारे अनेकजण पाहायला मिळतात. मात्र, काहीजण असेही असतात, जे आजाराला जिद्दीने सामोरे जातात. कोहळे ले-आउट (झिंगाबाई टाकळी) येथील मेश्राम परिवार त्यापैकीच एक. या परिवारातील पाच वर्षांच्या चिमुकलीसह आईलाही कोरोनाने घेरले. परंतु, हिंमत न हारता दोघींनीही घरीच उपचार घेऊन कोरोनावर विजय मिळविला.

rayra and roshani meshram
सहा महिन्यापासून रेशनच्या धान्यासाठी 'त्यांची' वणवण; अधिकारी देतात सतत हुलकावणी

एमएसईबीमध्ये कार्यरत राहुल मेश्राम यांना दोन मुली आहेत. एकेदिवशी धाकटी मुलगी रायराला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्यांनी बालरोगतज्ज्ञांकडे नेले. डॉक्टरांनी त्यावेळी नव्या स्ट्रेनमध्ये लहान मुलांमध्ये पोटदुखी व उलटीसारखी लक्षणे आल्याचे सांगून, खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाची चाचणी करून घेण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. वडिलांनी लगेच तिला 'होम आयसोलेट' करून उपचार सुरू केले. संक्रमण होण्यापूर्वी मुलगी आई (रोशनी) जवळ राहिल्याने दोन-तीन दिवसांनी आईलाही कोरोनाची सौम्य लक्षणे दिसायला लागली. रोशनीच्या जिभेला चव नव्हती. शिवाय वासही येत नव्हता. त्यामुळे तिनेही आरटीपीसीआर चाचणी करवून घेतली, जी पॉझिटिव्ह आली. वडील आणि थोरली मुलगी मात्र निगेटिव्ह आले.

दोन आठवडे यशस्वी उपचार घेतल्यानंतर मायलेकी कोरोनामुक्त झाल्या. संक्रमण काळात दोघींनीही नियमित उपचारासोबतच रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी वाफारा, काढा, फळे, ड्रायफ्रुट्स, हिरव्या पालेभाज्या व प्रोटिनयुक्त संतुलित आहार घेतला. शिवाय नियमित ऑक्सिजन लेव्हल तपासले. उल्लेखनीय म्हणजे घरातही मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स राखले. या सर्व उपायांमुळेच मायलेकी कोरोनावर सहज विजय मिळवू शकल्या. राहुल यांनीही दोघींना सतत 'मोटिव्हेट' केले, त्यांना हिंमत दिली. इतकेच नव्हे ड्यूटी सांभाळून घरची कामेही केलीत.

कोरोना पाझिटिव्ह आलात तरी घाबरून जाऊ नये. वेळेत योग्य उपचार केल्यास त्यावर सहज मात करता येऊ शकते. रुग्ण मानसिकदृष्ट्या खचला असेल, तर त्याला हिंमत देणे खूप गरजेचे असते. मी संक्रमण काळात नेमका याच गोष्टींवर भर दिला.
-राहुल मेश्राम, रायराचे वडील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com