गृहविलगीकरणातील रुग्णसंख्येत घट; २४ तासांत ८१ मृत्यू

गृहविलगीकरणातील रुग्णसंख्येत घट; २४ तासांत ८१ मृत्यू

नागपूर : दीड महिन्यांपासून करकचून बसलेला वेढा हळूहळू का होईना सैल होण्यास प्रारंभ झाला आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याने नागरिकांच्या जिवाला लागलेला घोर कमी होत आहे. २४ तासांत जिल्ह्यात ४ हजार ९०० नागरिकांना कोरोनाने (coronavirus) वेढले तर ८१ रुग्णांचा बळी घेतला. यामुळे बाधितांची संख्या ४ लाख ३७ हजार८३८ झाली आहे. तर मृत्यू ७ हजार ९०९ झाले आहेत. (81 deaths in 24 hours in Nagpur corona news)

जिल्ह्यात आठ दिवसांपूर्वी गृहविलगीकरणात ६१ हजार ३३६ बाधित उपचार घेत होते. मात्र सहा दिवसांनंतर गृहविलगीकरणातील रुग्णसंख्या ५१ हजारावर आली आहे. गेल्या महिन्याभरात जिल्ह्याने कोरोनाचा प्रचंड मार झेलला.मृत्यू ८ हजारांच्या उंबरठ्यावर असून बाधितांचा आकडा साडेचार लाखांजवळ पोहचला आहे. सद्यस्थितीत ६४ हजार ५९७ कोरोनाबाधित आहेत. ३५ हजार ५८१ शहरात तर ग्रामीण भागात २९ हजार १६ कोरोनाबाधित आहेत.

गृहविलगीकरणातील रुग्णसंख्येत घट; २४ तासांत ८१ मृत्यू
सतत मोबाईलच्या नादात न राहता चिमुकलींन जपला छंद; दगडातून साकारल्या सुंदर कलाकृती 

जिल्ह्यात गुरूवारी २१ हजार ८७८ संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ हजार ९०० बाधित आढळले. यात शहरातील २ हजार ७२० तर ग्रामीण भागातील २ हजार १६७ जण बाधित आढळले. यात जिल्ह्याबाहेरच्या १३ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरातील बाधितांची संख्या ३ लाख १२ हजार२४ झाली आहे. तर ग्रामीण भागातील बाधितांचा आकडा १ लाख २४ हजार५०४ झाला आहे.

पन्नास टक्के चाचण्या खासगीत

जिल्ह्यात गुरुवारी २१ हजार ८७८ कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यातील पन्नास टक्क्यांपेक्षा ७ जास्त अर्थात ११ हजार ९७१ कोरोना चाचण्या या शहरातील खासगी प्रयोगशाळांमध्ये झाल्या. उर्वरित ४५ टक्के चाचण्या या सरकारी प्रयोगशाळेमध्ये झाल्या आहेत. विशेष असे की, ३ हजार ८७३ या रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या झाल्या. केवळ मेयो रुग्णालयात २ हजार १०० चाचण्या झाल्या. त्यापाठोपाठ १ हजार ११६ चाचण्या मेडिकलमध्ये तर उर्वरित केंद्रावर ६०० ते ७०० चाचण्या झाल्या आहेत.

मेडिकलमधील मृत्यू - ३६४४

मेयोतील मृत्यू -२७२५

एम्समधील मृत्यू - १००

खासगीतील मृत्यू -१४४०

(81 deaths in 24 hours in Nagpur corona news)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com