Dr. Brajesh Dixit : महामेट्रोच नव्हे तर नागपूरसाठीही ऐतिहासिक दिवस; डॉ. ब्रजेश दिक्षित

डॉ. ब्रजेश दिक्षित : डबल डेकर पुलासाठी गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र
Dr. Brajesh Dixit
Dr. Brajesh Dixit sakal

नागपूर : महामेट्रोने सर्व कामे जागतिक दर्जाची केली. वर्धा मार्गावरील सर्वाधिक लांबीचा डबल डेकर पुलाची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली. आज याबाबतचे प्रमाणपत्र मिळत असून हा दिवस केवळ महामेट्रोसाठी नव्हे तर शहर, राज्य व देशासाठी ऐतिहासिक आहे, असे आनंदोद्‍गार महामेट्रोचे व्यवस्थापकीय डॉ. ब्रजेश दिक्षित यांनी काढले. या विक्रमाचे प्रमाणपत्र देण्यासाठी गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या परीक्षक व निर्णायक मंडळाचे प्रमुख ऋषी नाथ लंडनवरून नागपुरात आले. दीक्षाभूमीजवळील महामेट्रो भवनमध्ये प्रमाणपत्र वितरणाचा सोहळा पार पडला. ऋषी नाथ यांनी डॉ. ब्रजेश दिक्षित यांना गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र दिले.

यावेळी डॉ. दिक्षित बोलत होते. या पुलाचे काम करताना अनेक आव्हाने होती. महामेट्रोच्या टीमने या आव्हानांवर मात करीत जागतिक स्तराचा सुंदर पूल तयार केला. यापुढेही अनेक विक्रम महामेट्रो करणार आहे. कमीत कमी वेळात मेट्रोने ९० हजारांवर प्रवासी संख्येचा आकडा पार केला, असेही डॉ. ब्रजेश दिक्षित म्हणाले. आता ४० किमीपैकी २६ किमीचा मेट्रो मार्ग सुरू झाला. मेट्रो पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर प्रवासीसंख्या दुप्पट वाढणार आहे. ट्रांझिट ओरिएन्टेड डेव्हलपमेंटची अंमलबजावणी करणारे नागपूर पहिले शहर असून आता सारेच शहर नागपूरचे अनुकरण करीत असल्याचेही डॉ. दिक्षित म्हणाले. यावेळी प्रकल्प संचालक महेशकुमार यांनी डबल डेकर पुलाच्या जडणघडणीची माहिती दिली.

महामेट्रोला प्रमाणपत्र देण्याचा आनंद : ऋषी नाथ

मेट्रो श्रेणीमध्ये महामेट्रोला सर्वाधिक लांबीच्या डबल डेकर व्हायाडक्ट पूलनिर्मितीच्या विक्रमासाठी प्रमाणपत्र देण्याचा मोठा आनंद आहे, असे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे परिक्षक व निर्णायक मंडळाचे प्रमुख ऋषी नाथ यांनी यावेळी सांगितले. महामेट्रोच्या कामाची स्तुती करताना त्यांनी कुठल्याही मेट्रो प्रकल्पातील हा सर्वात मोठा लांबीचा पूल असल्याचेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com