शहरात कोरोनाने एकच मृत्यू; ग्रामीणमध्ये सलग पाचव्या दिवशी शून्य

शहरात कोरोनाने एकच मृत्यू; ग्रामीणमध्ये सलग पाचव्या दिवशी शून्य

नागपूर : वैद्यकीय तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचे संकेत (coronavirus) दिले आहेत. मात्र, सद्यातरी दुसरी लाट थांबली आहे. शहरात एक आणि जिल्ह्यबाहेरून रेफर झालेला एका अशा दोन कोरोनाबाधितांचा गुरुवारी मृत्यू (Two Corona victims died Thursday) झाला. तर नव्याने ७४ कोरोनाबाधितांची भर पडली. बाधितांपेक्षा तीन पट २३२ जणांनी गुरुवारी (ता. १७) कोरोनावर मात केली. सध्या स्थितीत जिल्ह्यात १ हजार १७६ कोरोनाबाधित आहेत. यातील मेयो, मेडिकलसह विविध कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ २३१ कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. (A-single-death-by-Corona-in-the-Nagpur-city)

जिल्ह्यात दुसरी लाट थांबल्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यायांवरील कामाचा ताण संपला. विशेषत: जिल्ह्यात बाधितांसोबतच बळींच्याही संख्येत घट झाली आहे. गुरुवारी नागपूर शहरात केवळ एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ग्रामीण भागामध्ये सलग पाचव्या दिवशी एकाचाही मृत्यू झाला नाही. पंधरा महिन्यांत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबळींची संख्या ९ हजार ०१५ वर पोहोचली आहे.

शहरात कोरोनाने एकच मृत्यू; ग्रामीणमध्ये सलग पाचव्या दिवशी शून्य
धोका वाढला! 'मेडिकल'च्या कोविड वॉर्डात दहा मुले भरती

शहरातील ४३, ग्रामीणमधील ३० व जिल्ह्याबाहेरील १ असे ७४ बाधित आढळल्याने आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांचा आकडा ४ लाख ७६ हजार ६५१ झाली आहे. तर दिवसभरात शहरातून १५२ व ग्रामीणमधून ८० असे २३२ जण बरे कोरोनामुक्त झाले. यामुळे कोरोनावर मता करणाऱ्यांची संख्या ४ लाख ६६ हजार ४६० झाली आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९७.८६ वर पोहोचले.

कोरोनाचे ८७१ रुग्ण घरीच

नागपुरातील कोरोनाची सक्रिय (अ‍ॅक्टिव) रुग्णसंख्या घटली आहे. शहरात १ जार ०७९ तर ग्रामीण भागात ९७ कोरोनाबाधित आहेत. यापैकी ८७१ जणांना कुठलेही लक्षणे नाहीत. यामुळे ते घरीच उपचार घेत आहेत. जिल्ह्यात ८ हजार २०१ चाचण्या झाल्या. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात २९ लाख ६५ हजार १३ चाचण्या झाल्या आहेत. यातील २१ लाख ७ हजार ३१३ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या आहेत. तर ८ लाख ५७ हजार ७०० रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या झाल्या आहेत.

(A-single-death-by-Corona-in-the-Nagpur-city)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com