Accident News : चालकाचे कारवरून नियंत्रण सुटल्याने अपघात; बापलेकीचा मृत्यू; दोघे जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Accident On Nagpur-Jabalpur National Highway Death fathers daughter two injured police

Accident News : चालकाचे कारवरून नियंत्रण सुटल्याने अपघात; बापलेकीचा मृत्यू; दोघे जखमी

कन्हान : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील न्यू हायवे स्टार ढाब्यासमोर चालकाचे कारवरून नियत्रंण सुटले. त्यामुळे सुसाट कार लोखंडी रेलिंगला धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. वडील परवेज अंसारी आणि मुलगी अफिफा अंसारी अशी मृतांची नावे आहेत.

नवी दिल्लीवरून बैंगळुरूला जाण्यासाठी अमराह परवेज अंसारी (वय ३३) रा. सिहारा ता. दामपूर जि.बिजनेर, उत्तरप्रदेश, परवेज कुर्शीद अंसारी (वय ३६) आणि मुलगी अफिफा परवेज अंसारी (वय १२) हे कारने (क्रमांक केए ०४ एन सी ००४२) निघाले होते. नदीम नईस अंसारी (वय २८) कार चालक होता.

रविवार मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गाने मनसरवरून नागपूरला जात असताना बोर्डा टोल नाका ओलांडल्यानंतर काही अंतरावर चालक नदीमचे कारवरून नियत्रंण सुटले. कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या लोखंडी रेलिंगला जाऊन जोरदार धडकली.

यात अमराह अंसारी यांच्या डाव्या हाताला मार लागला. अमराह अंसारी ह्या बेशुद्ध झाल्या. परवेज आणि मुलगी अफिफा यांचा अपघातात घटनास्थळी मृत्यू झाला . सदर घटनेची माहिती कन्हान पोलिसांना मिळताच पोलिस हवालदार गुरुप्रकाश मेश्राम हे पथकासह घटनास्थळी पोहचले. जखमींना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात पोलिस हवालदार गुरुप्रकाश मेश्राम हे करीत आहेत.

टॅग्स :Nagpuraccidentcar