नागपूर : टण… टण… टण…दोन वर्षांनंतर शाळेत किलबिलाट

पहिल्याच दिवशी ८२ हजारांवर उपस्थिती
नागपूर : टण… टण… टण…दोन वर्षांनंतर शाळेत किलबिलाट
नागपूर : टण… टण… टण…दोन वर्षांनंतर शाळेत किलबिलाटesakal

नागपूर : शाळा म्हणजे ग्रामीण भागातील चैतन्य.कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून हे चैतन्यच हरवले होते. परंतु, कोरोना प्रसाराचे संकट टळल्याने बुधवारपासून (ता.१) ग्रामीण भागातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्या आहेत. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. कुठे पुष्पगुच्छ देऊन तर कुठे ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी ८४ हजारांवर विद्यार्थांनी हजेरी लावली.

ग्रामीण भागात ५ ते १२ व शहरी भागात ८ ते १२ चे वर्ग सुरू करण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली होती. आता १ ते ४ चे वर्ग सुरू झाले. सोबतच कोरोनाचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक सूचनांची भलीमोठी यादीही शाळांना दिली. शाळा व्यवस्थापनानेही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शक्य त्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला.

नागपूर : टण… टण… टण…दोन वर्षांनंतर शाळेत किलबिलाट
जळगाव : हिरापूरजवळ भीषण अपघात; तीन जण जागीच ठार

प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी अशा पद्धतीने बैठकीची व्यवस्था करण्यात आली. नियमानुसार शाळा भरल्या की नाही हे बघण्यासाठी शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी व त्यांच्या पथकाने शाळाशाळांमध्ये भेटी दिल्या. ग्रामीण भागातील पालकांनीही उत्साहाने विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले. शाळांनीही वातावरण निर्मिती केल्याने विद्यार्थी उत्साहाने शाळेत आले. जिल्ह्यात बुधवारी ग्रामीण भागातील २०२१ शाळांपैकी १८९८ शाळा सुरू झाल्या. तर नगरपरिषद व नगरपंचायतमधील २८७ शाळांपैकी २५१ शाळांमध्ये ५२ हजार ६६१ पैकी १७ हजार ७७४ विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. पालकांमध्ये कोरोनाची भीती असल्याने पहिल्या दिवशी विद्यार्थी संख्या रोडावली. मात्र आठवडाभरानंतर विद्यार्थी नक्कीच वाढतील, अशी आशा शिक्षकांनी व्यक्त केली.

शाळा व विद्यार्थ्यांची उपस्थिती

नागपूर ग्रामीणमध्ये २०२१ शाळांपैकी १८९८ शाळा सुरू झाल्या. ६४,७८० विद्यार्थी उपस्थित होते. येथे ५९५६ शिक्षकांपैकी ५ ६९ शिक्षकांची उपस्थिती होती. तर नगरपरिषद व नगरपंचायतच्या हद्दीतील २८७ शाळांपैकी २५१ शाळा सुरू झाल्या. १७,७७४ विद्यार्थी उपस्थित झाले. येथे २२०३ शिक्षकांपैकी १५४९ शिक्षकांची उपस्थिती होती.

तापमान मोजल्यानंतरच प्रवेश

शाळेच्या प्रवेशद्वारावर शिक्षक थर्मल स्कॅनरने विद्यार्थ्यांचे तापमान मोजत होते. शरीराचे तापमान सामान्य असेल तरच विद्यार्थ्याला वर्गात सोडले जात होते.

सॅनिटायझरचा फवारा

इकडेतिकडे हात लावू नका असे सांगत शिक्षक आणि कर्मचारी प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातावर सॅनिटायझरचा फवारा मारत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com