Begging Ban In Nagpur : G20 बैठकीपूर्वी नागपुरात भीक मागण्यावर बंदी; होणार ६ महिन्यांपर्यंतची शिक्षा

Ahead of G20 meet  begging is ban in nagpur six month prision if caught
Ahead of G20 meet begging is ban in nagpur six month prision if caught

G20 शिखर सम्मेलनापूर्वी नागपूर शहरात भीक मागण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शहर पोलीस प्रमुख अमितेश कुमार यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यांनी बुधवारी (8 मार्च) कलम-144 अंतर्गत एक अधिसूचना जारी केली आहे, जी व्यक्ती किंवा गटांना भीक मागण्यास किंवा रस्त्यावरून जाणाऱ्यांना पैसे देण्यास भाग पाडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

हा नियम 30 एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. अमितेश कुमार यांनी सांगितले की, 19-20 मार्च रोजी जी-20 शिखर परिषद आणि बैठका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक भिकारी आक्षेपार्ह कामांमध्ये गुंतलेले असून, लोकांना पैसे देण्यास भाग पाडत असल्याचे देखील कुमार म्हणाले. भिकारी वाहतूक सुरळीत चालवण्यात अडथळा निर्माण करतात, असेही पोलिस आयुक्तांचे म्हणणे आहे.

Ahead of G20 meet  begging is ban in nagpur six month prision if caught
Pune News : डीजेचा दणदणाट, वैतागलेल्या ज्येष्ठ नागरिकाने फोडली १० लाखांची साऊंड सिस्टीम

पकडले गेल्यास होणार कारावास

सार्वजनिक ठिकाणी कोणी भीक मागताना दिसल्यास त्याला एक ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी तुरुंगात पाठवले जाऊ शकते. परिस्थितीनुसार कायद्यातील इतर कलमांचाही वापर केला जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आले आहे.

Ahead of G20 meet  begging is ban in nagpur six month prision if caught
Mumbai Crime News : 'त्या' सहा तासात नेमकं घडलं काय? घाटकोपरच्या जोडप्याच्या मृत्यूमागील गूढ वाढलं

यापूर्वी, अमितेश कुमार यांनी ट्रान्सजेंडर्सना ट्रॅफिक जंक्शन, सार्वजनिक ठिकाणी भीक मागण्यापासून रोखण्यासाठी सीआरपीसीच्या कलम 144 ला लागू केले होते. ट्रांसजेंडर्सना विवाह आणि अशा प्रकारच्या इतर ठिकाणी देणग्या मागण्यावर बंदी घालण्यात आली. मात्र, नंतर हे नियम शिथिल केले. ते म्हणाले होते की जर कोणी त्यांना (ट्रान्सजेंडर) आमंत्रित केले असेल तर ते अशा ठिकाणी जाऊ शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com