Air Pollution nagpur air quality index recorded over 330 health doctor
Air Pollution nagpur air quality index recorded over 330 health doctorsakal

Air Pollution : प्रदूषणामुळे नागपूरकरांचा गुदमरला श्‍वास

शहरातील हवा झाली खराब, मॉर्निंग वॉक होतोय धुरात

नागपूर : प्रकल्प कामे, वातावरणातील बदलामुळे शहरातील हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरलेली असून प्रदूषणात वाढ झालेली आहे. नागपूरकरांचा मॉर्निंग वॉक धूर, धूळ आणि धुक्यात होत आहे. हवेचा गुणवत्तेचा निर्देशांक ३३० पेक्षा अधिक नोंदविण्यात आलेला आहे. एनएएक्युएसच्या निर्देशानुसार मुंबईची हवा अत्यंत खराब झालेली आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. देशात दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहर गणले जाते. त्या पाठोपाठ आता नागपूरची देखील प्रदूषित शहर म्हणून नोंद होणार आहे.

नागपूरच्या हवेच्या गुणवत्तेचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्युआय) हा २७६ खराब आणि ३३३ ते ३४६ अत्यंत खराब पातळीच्या जवळ पोहोचला आहे. हा प्रदूषणाचा उच्चांक असून यामुळे नागपूरकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या आठवड्यात हा इंडेक्स १३८ आणि २७७ च्या दरम्यान होता. मात्र, त्यात आता वाढ झाली आहे. हा इंडेक्स सध्या खराब अत्यंत खराब या पातळीवर आहे. येणारे दोन दिवस हवेची गुणवत्ता अशीच राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी तसेच बाहेर पडताना मास्क वापरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली आहे. वाऱ्याचा वेग कमी झाला आहे. यामुळे वातावरणातील धुलीकण वाढले आहे. शहरात नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा आणि डिसेंबरचा पहिला आठवडा हा सर्वात प्रदूषित होता. मात्र, आता डिसेंबरमध्ये देखील हवेचा एक्युआय हा जास्त राहण्याची शक्यता आहे.

हवा गुणवत्ता निर्देशांक

तारीख हवेची गुणवत्ता (एक्युआय)

१ डिसेंबर ३३३

२ डिसेंबर ३२४

३ डिसेंबर ३४२

४ डिसेंबर ३३४

५ डिसेंबर ३२९

६ डिसेंबर २७६

हवा गुणवत्ता निर्देशांकाची स्थिती

 ५ ते ५० : हवा स्वच्छ

 ५१ ते १०० ः समाधानकारक

 १०१ ते २०० : शुद्धता मध्यम

 २०१ ते ३०० : वाईट हवा

 ३०१ ते ४०० : हवेची गुणवत्ता जास्त वाईट

 ४०१ ते ५०० : आरोग्यासाठी अतिशय धोकादायक

वाढलेली थंडी आणि हवेचा वेग संथ झाल्याने प्रदूषण वाढलेले आहे. यामुळे वायू आणि धुळीचे कण जमिनीच्या जवळच स्थिरावतात. यासोबतच शहरातील वाढलेली वाहने, सुरु असलेले बांधकाम, उद्योग आणि जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळेही हवेतील प्रदूषणात विक्रमी वाढ झालेली आहे.

- सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com