अकोला : अस्वस्थ आईची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola harassment Alleged on son mother committed suicide

अकोला : अस्वस्थ आईची आत्महत्या

अकोला : उगवा येथील एका महिला व तिच्या पतीने गावातील युवकावर छेडखानी केल्याचा आरोप केला. त्यानुसार अकोट फैल पोलिसांनी युवकाविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. त्यानंतर या दाम्पत्याने युवकाच्या आई-वडिलांना शिवीगाळ करून मारहाण केली होती. मुलाला अटक केल्यामुळे व दाम्पत्याने मारहाण केल्यामुळे अस्वस्थ झालेल्या मुलाच्या आईने काही दिवसांपूर्वी गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणात न्यायालयाने अकोट फैल पोलिसांनी दाम्पत्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

अर्जदार अरुण सोपान राजगुरे यांच्या मुलावर उगवा गावातील दाम्पत्याने विनयभंग केल्याचा खोटा आरोप करून पोलिसात तक्रार दिली. त्यामुळे अकोट फैल पोलिसांनी मुलावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. नंतर त्याची रवानगी कारागृहात केली. अरूण राजगुरे यांच्या मुलाचा जामिन अर्ज प्रलंबित असताना, दाम्पत्याने कोर्टात व कोर्टाबाहेर अर्जदार आणि त्याच्या पत्नीस जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर घरी जाऊन मारहाण केली आणि जामिन पाहिजे असेल तर २ लाख रुपये देण्याची मागणी केली. या दाम्पत्याच्या त्रासाला कंटाळून अरूण राजगुरे यांच्या पत्नीने आत्महत्या केली.

याची तक्रार देण्यासाठी अरूण राजगुरे हे अकोट फैल पोलीस स्टेशन येथे गेले असता, पोलिसांनी तक्रार घेतली नाही. त्यामुळे अरूण राजगुरे यांनी विद्यमान प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे कलम १५६(३) सीआरपीसी प्रमाणे अर्ज दाखल केला. न्यायालयाने दाम्पत्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, मारहाण करणे, शिवीगाळ करणे असे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश अकोट फैल पोलिसांना दिले आहे. अर्जदारतर्फे ॲड. अजय लोंढे वकील यांनी काम पाहिले.

Web Title: Akola Harassment Alleged On Son Mother Committed Suicide

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Akola
go to top