सुरक्षा प्रदान करा, अन्यथा आमचाही दाभोळकर, पानसरे होईल... कोणी व्यक्‍त केली ही भीती?

Amol Mitkari meets Anil Deshmukh for security
Amol Mitkari meets Anil Deshmukh for security

नागपूर : फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आम्ही पुरोगामी विचार मांडतो. त्यामुळे जिवाला केव्हाही धोका होऊ शकतो. आमचाही दाभोळकर, पानसरे किंवा कलबुर्गी होऊ नये म्हणून सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ता अमोल मिटकरी यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली. 

शनिवारी सकाळी मिटकरी यांनी गृहमंत्री देशमुख यांच्या निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. यानंतर माध्यमांशी बोलताना मिटकरी म्हणाले, मी राज्यभर पुरोगामी विचार मांडतो. "एनआरसी'बाबतही जागृती करतो. लोकांना त्यांच्या सुरक्षेबाबत आश्‍वस्त करतो. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये जनता असुरक्षित नाही, हे व्याखानांच्या माध्यमातून लोकांना पटवून सांगतो.

फुले, शाहू, आंबेडकरांची विचारधारा लोकांमध्ये पोहोचवतो. पण या कार्याला प्रतिगामी लोकांचा विरोध आहे. त्यामुळे माझ्यासारख्यांच्या जिवाला केव्हाही धोका होऊ शकतो. त्यामुळेच सरकारकडे सुरक्षा देण्याचा मागणी केली आहे. हे आपले सरकार आहे म्हणून मागणी केली. मागच्या सरकारलाही याबाबत निवेदन दिले होते. पण फायदा झाला नाही. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शब्द दिला आहे. त्यामुळे मी आश्‍वस्थ आहे. 

संत तुकारामांपासून छळ सुरूच

पुरोगामी विचारांच्या लोकांचा छळ ही काही आजची बाब नाही तर संत तुकारामांपासून हा प्रकार चालत आला आहे. संत तुकाराम प्रखर पुरोगामी विचारांचे होते. त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. मी सुद्धा त्यांच्याच विचारांचा प्रसार करतोय. हे करताना वेळोवेळी धोके जाणवतात. कुणालाही भीत नाही. पण "सर सलामत तो पगडी पचास', त्यामुळे काळजी केली पाहिजे. जीवच नाही राहिला तर हे कार्य पुढे जाणार कसे, असा प्रश्‍न मिटकरी यांना उपस्थित केला. या सरकारकडून सुरक्षा पुरविली जाईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com