सरकारी घोषणेनुसार इतरांना मदत, पण ऑटो चालक प्रतीक्षेतच

Auto-Rickshaw
Auto-Rickshawe sakal

नागपूर : सरकारच्या घोषणेनुसार घटकांना मदत मिळणे सुरू झाले आहे. ऑटोचालकांना (auto rickshaw driver) सानुग्रह अनुदानवाटपाची प्रक्रियाच अद्याप खोळंबली असल्याने त्यांच्या जिवाला घोर लागला आहे. (auto rickshaw driver not still waiting for help in nagpur)

Auto-Rickshaw
नागपुरात ६१ हजार नवीन लसी, पाच केंद्रावर १८ वर्षांवरील लसीकरण सुरू

राज्यात कडक निर्बंधांची घोषणा करतानाच ऑटोचालकांसह दुर्बल घटकांना आर्थिक मदतीची घोषणा सरकारने १४ एप्रिलला केली. घोषणेला साधारण २० दिवसांचा कालावधी लोटला आहे. परिवहन मंत्र्यांनीही २० एप्रिलरोजी ऑटोरिक्षाचालकांच्या संघटनांची बैठक घेत मदत मिळणारच असल्याचे सांगितले. त्यानंतर दुर्बल घटकांपैकी काहींना मदत मिळणे सुरू झाले. पण, कोरोनाच्या संकटामुळे गेल्या १४ महिन्यांपासून अडचणीत असणाऱ्या ऑटोचालकांपर्यंत मात्र तांत्रिक अडचणीमुळे अद्याप मदत पोहोचू शकली नाही. ऑटोचालकांच्या बँक डिटेल्ससह अन्य आवश्यक माहिती नसल्याने अडचण येत आहे. नोंदणीसह माहिती गोळा करण्याची प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने तातडीने होऊ शकणार आहे. त्यासाठी परिवहन विभागाकडून सॉफ्टवेअर तयार करण्याचे कार्य सुरू आहे. पण, त्यात विलंब होत असल्याने ऑटोचालकांच्या जिवाची घालमेल सुरू आहे.

Auto-Rickshaw
आतापर्यंत २५ शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू, रुग्णालयात आरक्षित बेड देण्याची मागणी

भविष्यासाठी नोंदणी महत्त्वाची

राज्यात सुमारे १२ लाख तर नागपूर जिल्ह्यात २० हजार परवानाधारक ऑटोचालक आहेत. १४ महिन्यांपासून मिळकतच बंद असल्याने त्यांना मिळणारी दीड हजारांची मदत पुरेशी नाही. पण, सरकारने ऑटोचालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापनेची घोषणा केली होती. अनुदानाच्या निमित्ताने सरकार दरबारी होणारी नोंदणी मंडळ कार्यान्वित होण्यासाठी, एकूणच ऑटोचालकांच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

निधी मिळवून देण्याची बतावणी

ऑटोचालकांना सानुग्रह अनुदानासाठी नोंदणीकरून देण्यासह निधी मिळवून देण्याची बतावणी करून लुबाडण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. अशाप्रकारची प्रकरणे सातत्याने समोर येत असून ऑटोचालकांनी सावध राहण्याचे आवाहन विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनने केले आहे.

लॉकडाउनमुळे ऑटोचालकांची अवस्था फारच दयनिय झाली आहे. त्यात संधीसाधूंकडून त्यांना लुबाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारने ऑटोचालकांना अनुदानाची कार्यप्रणाली तातडीने अंमलात आणावी.
-विलास भालेकर, अध्यक्ष, विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशन.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com