जेवण झाले की हात पुढे करतो, पुन्हा साखळदंड टाकून मागतो

वात्सल्य की वेदना? सावित्री-छबीलालच्या वाट्याला विचित्र भोग
Baby mentally retarded meal finished he extends his hand and asks again for chain nagpur
Baby mentally retarded meal finished he extends his hand and asks again for chain nagpursakal

नागपूर : गरीब असो की श्रीमंत. घरात नवीन पाहुणा येणार अशी चाहूल लागताच स्वप्नं रंगवली जातात. कुणीतरी येणार, दुडूदुडू चालणार, बोबडं बोलणार...या आनंदात हरखून जातील अशी स्वप्ने पाहण्यात बाळाच्या जन्माचा दिवस येतो. मात्र आई वडिलांना बाळ मतिमंद असल्याचे कळताच त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होतो. सावित्री-छबीलालच्या (बदललेली नावे) बाबतीतही हेच घडलं.

सावित्री आणि छबीलाल यांच्या घरात अठराविश्वे दारिद्र्य. पहिल्या मुलाच्या जन्मामुळे घरात आनंदी वातावरण. मात्र काही दिवस जाताच बाळाच्या चेहऱ्यावर वेगळीच लक्षणे दिसली. डॉक्टरांनी दिव्यांग असल्याचे सांगितल्यानंतर संकटच कोसळले. मुलाच्या कोमेजलेल्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी, त्याला बरे करण्यासाठी औषधोपचारांसह देवी-देवतांकडेही धाव घेतली. मात्र व्यर्थ ठरलं.

देव रुसला असेल का आमच्यावर?

आमच्या पदरातील असे संकट आले. आम्ही देवाला दोष देत नाही. पण तो रुसला असेल का आमच्यावर? असा प्रश्न छबीलाल करतात. आम्ही जिवंत असेपर्यंत त्याची सेवा करु. आमचे ते कर्तव्यच आहे. त्याचा कोणताही त्रास आम्हाला नाही. त्याला जेवण देताना एका हातातील साखळीचे कुलूप काढून घेतो. तो हाताने जेवण करतो, पुन्हा हात पुढे करतो. साखळीला कुलूप लावून घेतो. हे सत्य सांगताना वडील छबीलाल यांच्या डोळ्याच्या कडा आपोआपच ओल्या झाल्या.

ही तर तपश्चर्याच; अभिजित राऊत

बौद्धिक दिव्यांग बाळाचा सांभाळ करणे म्हणजे एकप्रकारे पालकांची तपश्चर्याच असते, असे मत नागपूर जिल्हा दिव्यांग केंद्राचे समन्वयक अभिजित राऊत यांनी व्यक्त केले. दिव्यांग प्रमाणपत्रामुळे त्यांना आवश्यक सेवा मिळू शकतात. जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी यांच्या मार्गदर्शनात अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्या सहकार्यातून एकाच छताखाली दिव्यांग प्रमाणपत्रापासून इतरही आवश्यक सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बालरोगतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, स्पीच थेरपिस्ट, चाइल्ड सायकॉलॉजिस्ट, मेडिसीन, नेत्र असे सर्व गट एकाच ठिकाणी मुलांना तपासतात. यामुळे पालकांना प्रमाणपत्र मिळवणे सोयीचे होते. याच उद्देशाने एकप्रकारची सेवाच आहे. आतापर्यंत २००० च्यावर दिव्यांग प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आल्याची माहिती अभिजित राऊत यांनी दिली.

नाईलाजाने निर्णय

सुरुवातीला काही वर्षे मुलगा शांत असायचा. मात्र पुढे अचानक आक्रमक झाला. पळून जाण्याचा, आत्महत्या करण्याचा प्रयत्न करु लागला. आपल्या काळजाचा तुकडा आपल्याला सोडून जाऊ नये, पळून गेल्यानंतर अपघात होऊ नये, त्याचा कोणाला त्रास होवू नये, याची खबरदारी घेण्यासाठी त्याचे दोन्ही हात आणि पायात साखळदंड टाकावे लागले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com