बोगस कागदपत्रांवर जामीन; टोळीचा पर्दाफाश

दोघांना अटक; गुन्हे शाखेची कारवाई, दोघे फरार
Gang arrested
Gang arrestedSakal

नागपूर - आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी बनावट कागदपत्र तयार करून देणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री पर्दाफाश केला. पथकाने टाकलेल्या छाप्यात २५० बनावट आधार कार्डसह ५ लाख ९६ हजार रुपयांचा माल जप्त केला असून दोघांना पथकाने अटक केली आहे.

सुनील मनोहर सोनकुसरे (वय ४५ रा.देशपांडे ले-आऊट, वर्धमाननगर), सतीश रामकुमार शाहू (वय ३२ रा. देशपांडे ले-आऊट, वर्धमाननगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. न्यायालयात अनेकदा आरोपीला जामीन मिळावा यासाठी सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र द्यावे लागते. त्यासाठी जमानत घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते. याचा फायदा घेत, सुनील आणि सतीश यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांनी बनावट आधारकार्ड, सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र, बनावट घरकर पावत्या, एक कार, बनावट सरकारी शिक्क्यांचा आधार घेत, बोगस कागदपत्र तयार केले. यावरुन बोगस जमानतदाराला उभे करुन त्याच्यामार्फत आरोपीला जमीन मिळवून देण्याचे काम केले. सकाळी अशीच कागदपत्र तयार करीत असल्याची माहिती युनिट २ या पथकाला मिळाली.

पथकाने सापळा रचून सुनील आणि सतीश यांना ताब्यात घेत त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे २५० बोगस आधारकार्ड आढळले. याशिवाय हजारावर नागरिकांचे पासपोर्ट फोटो, सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र, बनावट घर कर पावत्या, एक कार, बनावट सरकारी शिक्के, प्रिंटर, लॅपटॉपही आढळले. सध्या ते दोघेही फरार आहेत. ही कारवाई युनिट २ चे पोलिस निरीक्षक यांच्या नेतृत्वात पथकाने केली.

रवीच्या झेरॉक्स सेंटरचा वापर

विशेष म्हणजे या कामात त्यांना वर्धमाननगर येथे झेरॉक्स सेंटर चालविणारा रवी सावकर (रा. देशपांडे ले-आऊट) हा मदत करायचा. रवी त्यांना कागदपत्र तयार करण्यात मदत करायचे. त्यासाठी तो झेरॉक्स सेंटरवर स्कॅनसाठी आलेली रेशन कार्ड जपून ठेवायचा. त्यावरील नाव खोडून त्यावर दुसऱ्याचे नाव देत, शिक्क्यासह हुबेहुब बोगस कागदपत्र तयार करायचा. या कागदपत्रांचा वापर तो या कामासाठी करायचा. याशिवाय आरती शाहू (रा. मिनिमातानगर) यांच्या ऑनलाइन केंद्राद्वारेही अशा प्रकारचे ग्राहक शोधण्यात येत होते. केंद्रावर छापा टाकला असता, बनावट आधार कार्ड तयार करण्याचे साहित्य, कलर प्रिंटर व झेरॉक्स मशीन आढळले.

सहा वर्षांपासून सुरू आहे गोरखधंदा

न्यायालय परिसरात अनेकांना सॉल्व्हन्सी प्रमाणपत्राची गरज पडते. त्यासाठी वकीलही त्यांना ते प्रमाणपत्र तयार करुन आणण्यास सांगतात. त्यामुळे जमानतदार कसा मिळेल हा प्रश्‍न अनेकदा निर्माण होतो. अशा व्यक्तींना हेरुन सुनील आणि सतीश त्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे सॉल्व्हन्सी प्रमाणपत्र तयार करुन देण्याचा व्यवसाय गेल्या सहा वर्षांपासून सुरू होता. एखाद्या जमानतदाला उभे करत, त्याचे नाव आणि पत्ता दुसराचा दाखविण्यात येत होता. याशिवाय त्याचे बनावट आधारकार्डही तयार करण्यात येत होते. ही टोळी न्यायालयात जामिनाच्या वेळी बनावट आधारकार्ड सादर करत असे. त्यांच्याकडे प्रत्येक व्यक्तीसाठी वेगवेगळ्या दरानुसार प्रमाणपत्र तयार करुन मिळत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com