भंडारा : गळफास घेऊन एसटी चालकाची आत्महत्या

आगारात ड्यूटीवर जात असल्याचे सांगून सायंकाळी घरून गेले. रविवारी मुलाने फोन केला; पण
ST driver commits suicide
ST driver commits suicidesakal

भंडारा : पवनीच्या एसटी आगारात कार्यरत असलेला आंबाडी येथील चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. मृताचे नाव भिवराव सखाराम कळंबे (वय ५१) असे आहे.

आंबाडी येथील श्री. कळंबे शनिवारी पवनी आगारात ड्यूटीवर जात असल्याचे सांगून सायंकाळी घरून गेले. रविवारी मुलाने फोन केला; पण त्यांचा फोन बंद असल्याने पवनी आगारात फोन केला. तेव्हा ते कामावर आलेच नाही, असे सांगण्यात आले.

दरम्यान, रविवारी मृताचा मुलगा गोपाल कळंबे मथाडी शिवारात पिकाला खत टाकण्यास गेला. तेव्हा झाडाला दोरी बांधून गळफास घेतल्या स्थितीत भिवराव यांचा मृतदेह दिसून आला. याबाबत कारधा पोलिसांनी मर्ग दाखल केला असून, हवालदार गाढवे तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com