खबरदार! धार्मिक सलोखा बिघडवाल तर; पोलिस आयुक्तांचा इशारा

भोंगा प्रकरणाने राज्यभरात सांप्रदायिक वातावरण पसरण्याची शक्यता
Bhonga case mns possibility of spreading religious harmony in state nagpur
Bhonga case mns possibility of spreading religious harmony in state nagpur sakal

नागपूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह इतर पक्षाकडून सुरू असलेल्या भोंगा प्रकरणाने राज्यभरात सांप्रदायिक वातावरण पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता, शहर पोलिस आयुक्तांनी तसे करणाऱ्या नेत्यांना कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. राज्यात सध्या हनुमान चालीसा, भोंगा यावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आहे. याबाबत मनसेने ३ मे पर्यंत अल्टीमेटम दिला आहे. याशिवाय शरद पवार यांचे मुस्लिमांबाबत ट्विट टाकून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यात भर घातल्याने राज्यातील वातावरण अतिशय तापले आहे. त्यातूनच खबरदारी म्हणून राज्यात दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

त्यातून नाशिक पोलिस आयुक्तांनीही त्याबाबत कारवाईचा इशारा दिला असताना आता शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीही अशा प्रकारे सांप्रदायिक वातावरण निर्माण करीत, शहरातील शांततेला भंग करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला. शहरात धार्मिक सलोखा आणि सामाजिक शांतता राखण्यासाठी प्रत्येक नेत्यांशी चर्चा करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय परिमंडळ स्तरावरही पोलिसांद्वारे विविध धर्म आणि त्यांच्या नेत्याबरोबर वारंवार संवाद सुरू असल्याचे ते म्हणाले. शहरात कायदा व सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिस तत्पर असून नागरिकांनी अशा कुठल्याही अफवेवर विश्‍वास न ठेवता, आपल्या सद्सदविवेक बुद्धीचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com