स्वप्न पूर्ण करणारी ‘यंत्रे’; कुतूहलाचे रूपांतर केले व्यवसायामध्ये

स्वप्न पूर्ण करणारी ‘यंत्रे’; कुतूहलाचे रूपांतर केले व्यवसायामध्ये

नागपूर : स्पर्धेच्या युगामध्ये कल्पकतेला विशेष महत्त्व आहे. त्यानुसार प्रत्येक गोष्टीत नावीन्य शोधणे हा मानवी स्वभावच झाला आहे. विशेषत: येणाऱ्या पिढीमध्ये विविध बाबीसाठी कुतूहल असल्याचे पाहायला मिळते. छोट्यात-छोट्या गॉगलपासून ते महागड्या कारच्या तंत्राबाबत ही पिढी जागरूक राहून त्या विषयीच्या नोंदी घेत असते. मात्र, नागपुरातील दोन उद्योजकांनी याच कुतूहलाचे रूपांतर व्यवसायामध्ये केले आहे. त्यांचे हे कुतूहल देशापुरते मर्यादित न राहता आज जगासाठी उपयोगी ठरत आहे. तर अशा नावीन्यपूर्ण वस्तू शोधण्यासाठी हे उद्योजक देखील जग पादाक्रांत करीत आहेत. (Business-Dream-fulfilling-devices-Nagpur-News-Start-Business-nad86)

व्यवसायाच्या माध्यमातून देश विदेशातील मोठ-मोठ्या यंत्रांचा उपयोग देशामधील लहान-सहान कृषी उद्योगांना कमी खर्चामध्ये कसा करून देता येईल, त्यासाठी ते झटत आहेत. अनिल चौक आणि संजय क्षीरसागर असे या यशस्वी, मनाने तरुण असलेल्या आणि धाडसी उद्योजकांचे नाव. संजीवनी ॲग्रो मशिनरीच्या यंत्रांच्या माध्यमातून आजवर अडीच ते तीन हजार नागरिकांना व्यावसायिक म्हणून त्यांनी ओळख निर्माण करून दिली.

स्वप्न पूर्ण करणारी ‘यंत्रे’; कुतूहलाचे रूपांतर केले व्यवसायामध्ये
शेतकऱ्यांचे देवाला साकडे; फक्त सोयाबीनचे भाव घसरू देऊ नको!

अनिल चौक हे मूळचे नागपूरचे आणि संजय क्षीरसागर हे संगमनेर (जि. अहमदनगर) या छोट्याशा गावातील. चौक यांचे वडील महावितरण विभागामध्ये आणि क्षीरसागर यांचे वडील बॅंकेमधील नोकरीतून निवृत्त झाले. सर्वसामान्य कुटुंबामध्ये दोघेही लहानाचे मोठे झाले. त्यामुळे सहजीकच नौकरी करावी आणि चरित्रार्थ भागवावा, अशी अपेक्षा दोघांच्याही कुटुंबीयांची होती. वडीलधाऱ्या मंडळींच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी नोकरीची शोधा शोध सुरू केली. त्यासाठी १९९२ साली त्यांनी मुंबई गाठली. याच ठिकाणी या दोघांची नियतीने भेट घालून दिली. नाते रक्ताचे नसले तरीही त्यावेळी झालेल्या भेटीने आणि मैत्रीने आज त्यांना या यशोशिखरावर नेले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

१९९२ साली नोकरीची शोधा-शोध सुरू असतानाच घडलेल्या बाबरी मशीद प्रकरणामुळे मुंबईच्या अनेक कंपन्या कित्तेक महिने बंद होत्या. त्यामुळे, नोकरी लागलीच मिळणार नाही, हे निश्‍चित होते. यावर अनेक दिवस विचार विनिमय झाला. दोघेही चर्चा करण्यासाठी वेळोवेळी भेटत राहिले. कुटुंबीयांचे मत लक्षात घेतले. शेवटी, नोकरीचा पर्याय आणखी पुढले काही दिवस उपलब्ध होणार नसल्याने त्यांनी आपले पाऊल व्यवसायाकडे वळविण्याचे ठरविले.

स्वप्न पूर्ण करणारी ‘यंत्रे’; कुतूहलाचे रूपांतर केले व्यवसायामध्ये
बालगृहातील विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक प्रेरणादायीच

घरोघरी उपयोगी ठरणाऱ्या छोट्यात-छोट्या वस्तूंची ‘डोअर टू डोअर’ मार्केटिंग करण्यासाठी त्यांनी कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी या वस्तूविदर्भातील प्रत्येक घरी पोहोचविल्या. पण समाजाला काही तरी नवीन देण्याची भूक त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. व्यवसायासाठी नव नव्या संकल्पनांचा शोध घेण्यासाठी त्यांनी २००८ सालापासून विदेशवारीसुद्धा सुरू केली. या ठिकाणी भरणारे विविध प्रदर्शन, मेळावे आणि कारखान्यांना भेटी देत त्यांनी अशा नावीन्यपूर्णयंत्रांचा शोध लावला. त्या ठिकाणी यंत्र हेरताना ती यंत्र आपल्या देशातील ग्रामीण भागातील नागरिकांना उद्योग उभारणीसाठी कशी उपयोगी ठरतील, त्याचे स्वरूप आणि त्याच्या बांधणीसाठीचा खर्च कसा कमी करता येईल, याचा देखील विचार त्यांनी या दरम्यान केला.

अनिल चौक आणि संजय क्षीरसागर यांनी उद्योग व्यवसायातील यशाचे पाने लिहायला सुरुवात केली. विदेशातील यंत्राचा शेती पूरक व्यवसायाला बळकटी कशी मिळेल, या दृष्टीने त्यांनी व्यवसायाचे ध्येय निश्‍चित केले होते. व्यवसाय करण्याचा निश्‍चय केल्यानंतर सुमारे २० वर्षांनंतर (२०१२ साली) त्यांनी पहिले कृषी यंत्र विकसित केले. परदेशी बनावटीचे लाखो रुपयांचे हे यंत्र काही हजारांमध्ये उपलब्ध झाल्याने बेरोजगार युवक तीस ते पन्नास हजार रुपये महिना कमवू लागला आणि त्यांच्या उद्योगाने वेग घेतला.

दरम्यान, अनेक आव्हाने, कठीण दिवस त्यांच्या आयुष्यामध्ये आले. तरीही यंत्राच्या नव-नव्या संकल्पनांचा त्यांचा शोध सुरू होता आणि सुरू राहील, याबाबत शंका नाही. खास करून कोरोना सारख्या संकटामुळे अनेक बड्या बड्या कंपन्या बॅकफुटवर आल्या. मात्र, हिगणा एमआयडीसी (प्लॉट नं डब्ल्यू २७) परिसरातील संजीवनी ॲग्रो मशिनरीच्या यंत्रांना बाजारामध्ये मागणी वाढली. यावरून, त्यांच्या कल्पक बुद्धीचा, नावीन्यतेच्या घेतलेल्या ध्यासाचे यशामध्ये रूपांतर झाले, असे म्हटल्यास हरकत नाही. यंत्र आणि ग्रामीण भागाविषयी असणारी तळमळ त्यांना भविष्यामध्येही स्वस्थ बसू देणार नाही, हे देखील तितकेच खरे.

स्वप्न पूर्ण करणारी ‘यंत्रे’; कुतूहलाचे रूपांतर केले व्यवसायामध्ये
शक्तिमानच्या मित्रांनेच दिली टीप; दगडाने ठेचून केला होता खून

काही हजारांत हजारो रुपयांचा नफा

पशुखाद्य तयार करणारे यंत्र, सेंद्रिय खत तयार करणारे यंत्र, कृषी क्षेत्रातील टाकाऊ पदार्थांपासून बायोमास पॅलेट तयार करणारे यंत्र, मासळ्यांचे खाद्य तयार करणारे यंत्र, क्रशर मिल, धान्याचे पीठ तयार करणारे यंत्र असे विविध यंत्र त्यांनी विकसित केले. त्याचा उपयोग आज कृषी क्षेत्रामध्ये नव्याने पाऊल टाकणारी पिढी करते आहे. त्यामुळे, काही हजारांत गुंतवणुकीतून हजारो रुपयांचा नफा शेतकऱ्यांना होतो आहे.

देखभाल, दुरुस्तीचे प्रशिक्षण

शेतीमधील वेस्ट मटेरियलचा बेस्ट उपयोग, वित्त पुरवठा कुठून मिळेल ते त्याच्या देखभालीसाठी लागणारी सर्व साधनसामग्री ते पुरवतात. या यंत्रांचा उपयोग ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात करीत असल्यामुळे अशा नागरिकांना यंत्राची देखभाल करण्यासाठी किंवा दुरुस्ती करण्यासाठी तंत्रज्ञ सहजासहजी उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेऊन यंत्राची देखभाल आणि दुरुस्ती करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाते.

(Business-Dream-fulfilling-devices-Nagpur-News-Start-Business-nad86)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com