धोकाग्रस्त वन्यजीव क्षेत्र मंजुरीचे अधिकार केंद्राला

मुख्यमंत्र्यांची दिशाभूल; गडबडीत संपवली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक
Maharashtra forest department
Maharashtra forest departmentSakal

नागपूर - धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्र जाहीर करण्याचा अधिकार वनावाधिकार कायदा अन्वये केंद्राचा आहे. तरीही राज्यातील बोर अभयारण्यासह १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत मान्यता दिल्याने जंगल मे मोर नाच किसने देखा...अशी अवस्था राज्याच्या वनविभागाची झाली आहे.

वनाधिकार कायदा २००८नुसार उपरोक्त अधिकार राज्यांना नाहीत. राज्य सरकारला धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास क्षेत्राची फक्त शिफारस केंद्राकडे करावी लागते. केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीनंतरच त्याला अधिसूचित केली जाते. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीच्या घाई गडबडीत घेतलेली बैठक अपूर्ण अवस्थेत संपली. उर्वरित बैठक पुन्हा घेण्यात येणार आहे. दरम्यान, अनेक राज्य वन्यजीव मंडळाच्या सदस्यांनीही या बैठकीत मते मांडू दिली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

सोमवारी झालेल्या बैठकीत राज्यातील १० धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. त्यामध्ये मयुरेश्वर सुपे, बोर, नवीर बोर, विस्तारित बोर, नरनाळा, लोणार वन्यजीव अभयारण्य, गुगामल राष्ट्रीय उद्यान, येडशी रामलिंगघाट वन्यजीव अभयारण्य, नायगाव- मयूर वन्यजीव अभयारण्य, देऊळगाव-रेहेकुरी काळवीट अभयारण्यांचा समावेश आहे. राज्यात ६९२.७४ चौरस किलो मिटर क्षेत्राचे नवीन १२ संवर्धन राखीव क्षेत्र आणि विस्तारित लोणारसह तीन अभयारण्यांना मान्यता देण्यात आली. मुक्ताई भवानी संवर्धन राखीव क्षेत्रासह कोलामार्का आणि विस्तारित लोणार यांना वन्यजीव अभयारण्य घोषित करण्याचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची बैठक सोमवारी वर्षा शासकीय निवासस्थानी झाली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे, खासदार विनायक राऊत, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, , प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) वाय एल पी राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक मल्लिकार्जुन तसेच वन्यजीव मंडळाचे सदस्य, तज्ज्ञ तसेच विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आदी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. राज्यात आतापर्यंत एकूण १५ संवर्धन राखीव क्षेत्र अधिसूचित करण्यात आली असून, त्यातील ८ क्षेत्रांना गत दोन वर्षांत मान्यता देण्यात आली. त्यामध्ये या नव्या १२ संवर्धन क्षेत्रांची भर पडली आहे.

राज्यातील १२ संवर्धन राखीव क्षेत्र

चिवटीबावरी, अलालदारी (धुळे)

कळवण, मुरागड, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी (नाशिक)

रायगड, रोहा (जि. रायगड)

भोर (पुणे )

दरे खुर्द (महादरे) फुलपाखरू ( सातारा)

मसाई पठार (कोल्हापूर)

मोगरकसा (नागपूर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com