Nagpur News : बावनकुळे यांना कोणी रोखले ? अनिल देशमुखांचे आवाहन

अनिल देशमुख; खुलेआम बोलण्याचे केले आवाहन
Chandrasekhar Bawankule Anil Deshmukh appealed speak openly whatever they want to say politics
Chandrasekhar Bawankule Anil Deshmukh appealed speak openly whatever they want to say politicsesakal

नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना बोलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असून त्यांनी जे काही बोलायचे आहे ते खुलेआम बोलावे, असे आवाहन माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन केले. यावेळी देशमुख यांनी मी जे वर्धेच्या भाषणात बोललो तो विषय बावनकुळे यांना माहिती नसल्याचे स्पष्ट केले.

वर्धेच्या सभेत अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मी समझोता केला असता तर मला अटक झाली नसती असे वक्तव्य केले होते. यावरून सध्या वाद सुरू झाला आहे. याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. गृहमंत्री बावनकुळे यांना कोणी रोखले ?

असताना समझोता केला नाही म्हणून अटक करण्यात आली असे देशमुख यांचे म्हणणे असावे. असा याचा अर्थ काढला जात आहे. मात्र देशमुख यांनी अडीच वर्षांपूर्वी समझोता केला असता तर अटक झाली नसती असे आपण म्हटल्याचे सांगितले. तुम्ही कुठला समझोता केला नाही म्हणून अटक केली या प्रश्नावर त्यांनी बोलण्याचे टाळले. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपात घेण्यासाठी देशमुख यांनी विनवण्या केल्या होत्या याकडे लक्ष वेधले असताना अनिल देशमुख यांनी आरोप करणे विरोधकांचे कामच असल्याचे सांगून बोलणे टाळले.

बावनकुळे यांनी आपल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ लावला. त्यांना विषय माहिती नसावा म्हणून ते बोलले असावे. ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांना कोण अडवेल असा सवालही देशमुख यांनी उपस्थित केला. मी शरद पवार यांच्या नेतृत्वात अनेक वर्षांपासून काम करीत आहे. त्यामुळे भाजपात जाण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही. विधानसभेच्यावेळी भाजपात प्रवेश केला नाही म्हणून सूडबुद्धीने आपल्याला अडकवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

मी अतिरेकी आहे का?

मुंबईवर हल्ला करणारा अतिरेकी कसाबला ऑर्थर रोड जेलमधील ज्या बॅरेक क्रमांक १२मध्ये ठेवण्यात आले होते. आपल्यालाही तेथेच ठेवले होते असे सांगून अनिल देशमुख यांनी अप्रत्यक्षपणे अतिरेक्याप्रमाणे वागणूक दिल्याची सरकारवर टीका केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com